Wednesday, March 12, 2025
Homeक्रीडाचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून मायदेशी परतल्यानंतर केएल राहुलचा आयपीएलबाबत मोठा निर्णय, स्पष्टच सांगितलं...

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून मायदेशी परतल्यानंतर केएल राहुलचा आयपीएलबाबत मोठा निर्णय, स्पष्टच सांगितलं की…

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर उतरणाऱ्या केएल राहुलच्या संयमी खेळीचं कौतुक होत आहे. केएल राहुलने संघ अडचणीत असताना एका बाजूने भक्कमपणे उभा राहिला. संघात ऋषभ पंत सारखा आक्रमक खेळाडू असूनही कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याच्यावर विश्वास टाकला. त्याने हा विश्वास सार्थकी लावला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून मायदेशी परतल्यानंतर केएल राहुलने आयपीएबाबत एक मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. केएल राहुलचा हा निर्णय आयपीएल कर्णधाराबाबत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, केएल राहुलने आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची ऑफर नाकारली आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यापुढे कर्णधारपदाची ऑफर ठेवली होती. तसेच त्याला विनंती केली होती. मात्र त्याने कर्णधारपद भूषवण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. मिडिया रिपोर्टनुसार, केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर धुडकावून लावताना एक खेळाडू म्हणून संघात योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 

केएल राहुलने कर्णधारपद नाकारल्याने आता एका नावाची चर्चा होत आहे. हे नाव दुसरं तिसरं कोणी नसून चॅम्पियन्स ट्रॉफीत दमदार कामगिरी करणारा अक्षर पटेल आहे. अक्षर पटेल हा केएल राहुलसाठी पर्याय असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावापूर्वीच त्याला रिटेन केलं होतं. त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा असल्याचं आधीच अधोरेखित झालं होतं. त्यामुळे केएल राहुलने नकार दिल्यानंतर कर्णधारपदाची माळ अक्षर पटेलच्या गळ्यात पडेल यात काही शंका नाही. पण अक्षर पटेलकडे केएल राहुलसारखा कर्णधारपदाची अनुभव नाही. एक खेळाडू म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आहे. पण कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करून दाखवावं लागेल. आता त्याच्या नावावर मोहोर लागते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 

दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला आयपीएल मेगा लिलावात 14 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. आयपीएलमध्ये केएल राहुलने 2020-21 या कालावधीत पंजाब किंग्सचं कर्णधारपद भूषवलं होतं. त्यानंतर 2022 ते 2024 या कालावधीत लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यामुळे केएल राहुलच्या नावाचा विचार केला जात होता. केएल राहुलने 2018 ते 2024 या कालावधीत खेळलेल्या सात पैकी सहा पर्वात केएल राहुलने 500 हून अधिक धावा केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -