Wednesday, July 23, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : टॅक्टरखाली सापडून ३ वर्षीय बालिका ठार

कोल्हापूर : टॅक्टरखाली सापडून ३ वर्षीय बालिका ठार

सोनगे (ता.कागल ) येथे घोरपडे गल्लीत टॅक्टर मागे घेत असताना ट्रॉलीखाली चिरडून तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.१०) दुपारी घडली. कु.शिवन्या विजय चिंदगे असे या बालिकेचे नाव आहे.

 

या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत गावातील ट्रॅक्टर चालक दिग्वीजय विनायक कळंत्रे ( वय ३५ ) यांच्यावर मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी; सोनगे येथील घोरपडे गल्लीमध्ये टॅक्टर चालक दिग्वीजय विनायक कळंत्रे हा ट्रॅक्टर टॉली क्रं. (एम.एच.०९ सी.जे.९१४५ ) या ट्रॉलीमधून आणलेले साहित्य डंपिंग करून मागे घेत होते. यावेळी त्या ठिकाणी खेळत असलेली शिवन्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली. त्यानंतर कुटुंबियांनी तिला गंभीर अवस्थेत मुरगूड ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चिमुकलीचा अपघातात दुदैवी अंत झाल्याने सोनगे येथील घोरपडे गल्लीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

काळाने अखेर शिवन्यावर झडप घातलीच…

 

शिवन्या ही आपल्या दारात खेळत होती. तिला ट्रॅक्टर मागे घेण्यापूर्वी ट्रॉलीखाली सापडेल म्हणून दोन वेळा घरात नेवून सोडले होते पण ती पुन्हा पुन्हा बाहेर येत होती. तिसऱ्यांदा ती अचानक घराबाहेर आली आणि ट्रॉलीखाली चिरडली गेली. अशी घटनास्थळी चर्चा होती . त्यामुळे काळाने अखेर शिवन्यावर झडप घातलीच.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -