Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रसोनं या आठवड्यात 5010 रुपयांनी महागलं

सोनं या आठवड्यात 5010 रुपयांनी महागलं

भारतात सोन्याच्या दरात या आठवड्यात 5010 रुपयांची वाढ झाली आहे. 7 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत 24 कॅरेट सोन्याचे दर 5010 रुपयांनी वाढले आहेत. दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचे दर 4600 रुपयांनी वाढले आहेत. देशाची राजधानी नवी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 95820 रुपयांवर पोहोचले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर एकाच दिवशी 6250 रुपयांनी वाढून 96450 रुपयांवर पोहोचले होते.

 

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्य शक्यतेनं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय समजल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी वाढली आहे. गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. अमेरिकेनं चीनवर 145 टक्के टॅरिफ लादलं आहे, तर चीननं देखील उत्तर देताना देखील अमेरिकेवर 125 टक्के टॅरिफ लादलं आहे. यामुळं सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे.

 

नवी दिल्लीत सोन्याचे दर किती?

देशाची राजधानी नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 95820 रुपये आहेत.तर, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 87850 रुपये आहेत.

 

कोलकता, चेन्नई आणि मुंबईतील दर किती?

मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 87700 रुपये इतके आहेत. तर, 24 कॅरेटचे 10 ग्रॅम सोन्याचे दर 95670 रुपये इतके आहेत.

 

जयपूर, लखनौ आणि चंदीगडमध्ये काय स्थिती?

या तीन शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 95820 रुपये इतके आहेत. 22कॅरेट सोन्याचे दर 87850 रुपये इतके आहेत.

 

हैदराबादमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 87700 रुपये इतका आहे. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 95670 रुपये इतके आहेत.

 

 

भोपाळ आणि अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 87750 रुपये 10 ग्रॅम इतके आहेत. तर, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 95720 रुपये इतके आहेत.

 

चांदीचे दर

सोन्याप्रमाणं चांदीच्या दरात देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात चांदीचे दर 6000 रुपयांनी वाढले आहेत. चांदीचे दर 1 लाख रुपये किलो इतके आहेत. इंदौरच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 1500 रुपयांनी वाढले होते. चांदीचा सरासरी दर 96200 रुपये प्रति किलो इतके आहेत.

 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक निर्णयांचा परिणाम शेअर बाजारावर होत असल्यानं गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. एकीकडे सोन्याचे दर वाढत असल्यानं गुंतवणूकदारांना फायदा होतोय. मात्र, सोने दरवाढीमुळं ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं दिसून येतं. यामुळं सोने खरेदीमध्ये देखील घट झाल्यानं बाजारातील खरेदीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं. सोनं एक लाखांचा टप्पा किती दिवसात पार करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -