Thursday, February 12, 2026
Homeकोल्हापूरKolhapur : अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणार्‍यांची पोलिस ठाण्यात वरात

Kolhapur : अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणार्‍यांची पोलिस ठाण्यात वरात

अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणार्‍या नऊजणांची पोलिसांनी सोमवारी वरात काढली. नागदेववाडी येथे दुपारी झालेल्या बालविवाह प्रकरणी करवीर पोलिसांत नवरा, सासू, सासरा, आई, वडिलांसह भटजी, मंगल कार्यालयाचे मालक, व्यवस्थापक अशा एकूण नऊजणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

 

सांगली येथील विनायक सुभाष रोडे यांच्या मुलीचा स्वप्नील राऊत याच्याशी नागदेववाडी येथील एका मंगल कार्यालयात सोमवारी दुपारी विवाह झाला. दरम्यान, वधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र रावसाहेब भगत यांनी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीत वधूचे वय 17 वर्षे 6 महिने असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

याप्रकरणी वर स्वप्नील राजेंद्र राऊत (25), त्याचे वडील राजेंद्र मदनराव राऊत, आई प्रतिभा राऊत, भाऊ यश राऊत (सर्व रा. संध्यामठ, शिवाजी पेठ, कोल्हापूर), मुलीचे वडील विनायक सुभाष रोडे, आई दीपाली रोडे (रा. माधवनगर रोड, सांगली), मंगल कार्यालयाचे मालक सुनील वसंतराव जाधव-कसबेकर (फुलेवाडी), व्यवस्थापक सागर बाळासो पाटील (बोंद्रेनगर) व भटजी हनमंत जोशी (रा. बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापूर) या नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीवरून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम 9,10 व 11 प्रमाणे नऊजणांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी रात्री या सर्वांची पोलिस ठाण्यापर्यंत वरात काढली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -