पत्नीपासून मला वाचवा, अन्यथा मी मरतो, असे पत्नीपीडित म्हणताच पोलिसांचे कान टवकारले. पोलिस ठाण्यात अनेकदा पतीच्या त्रासाला कंटाळून तक्रार देण्यास महिला येतात. मात्र, उत्तरप्रदेशातील एका गावात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने तक्रार दिली. इतकेच नाही तर त्याला आपली कैफियत सांगताना रडू कोसळले.
ललितपूरमधील भदैयापुरा येथील बृजेश कुमार हा पत्नीच्या त्रासाला कंटाळून गाऱ्हाणे मांडण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे गेला.
‘पत्नीपासून वाचवा, मला न्याय द्या, अन्यथा इथेच मरेन,’ अशा शब्दांत पीडित पतीनं त्याची व्यथा मांडली.
माझी पत्नी प्रचंड त्रास देते. वर पोलिसात तक्रार दाखल करते. त्यामुळे पोलिस मला पकडून नेतात. मी मजूर करून पोट भरतो.
पोलिसांनी सतत पकडून नेल्यावर पोट कसं भरायचं, खायचं काय, घर कसं चालवायचं,’ असे सांगत तो ओक्साबोक्सी रडू लागला.
बृजेश कुमार रडवेल्या अवस्थेत पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या बृजेशला माध्यमांनी त्याला प्रश्न विचारले.
आपली व्यथा मांडताना बृजेश ओक्साबोक्सी रडू लागला. रडत रडतच त्यानं आपबिती सांगितली.
पत्नीपीडित कुमार म्हणाला, ‘माझी पत्नी प्रचंड त्रास देते. त्यामुळे मी पोलिस अधीक्षकांना भेटायला आलो होतो. पत्नी दररोज भांडते.
मारहाण करते आणि माझ्याच विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करते.
त्यामुळे पोलिसांनी मला १० ते १५ वेळा पोलिसांनी मला ताब्यात घेऊन अटक केली. पत्नी सतत वाद घालते. पैसे काढून घेते. माझ्या कुटुंबातील सदस्यांशीदेखील ती वारंवार भांडत राहते.’
मला मारले, चावले
कुमार म्हणाला, ‘आज पुन्हा एकदा पत्नीनं मला आपटलं, मारलं, मला चावली. अनेकदा पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी घरी येऊन समजवण्याचा प्रयत्न केला.
मला न्याय हवा. अन्यथा मी आत्महत्य करतो. मला न्याय मिळाला नाही, तर मला इथेच मरावं लागेल.
मी मजुरी करून कुटुंबाचं पोट भरतो. पण पत्नी सतत भांडत असल्यानं प्रचंड मनस्ताप होतो.
तिच्या तक्रारीनंतर पोलिस मला पकडून नेतात. मजुरी केली नाही तर माझ्या कुटुंबानं खायचं काय?’