Sunday, December 22, 2024
Homenewsपाणीपुरी वरून वाद झाल्याने पत्नीची आत्महत्या..

पाणीपुरी वरून वाद झाल्याने पत्नीची आत्महत्या..

पाणीपुरी खाण्याच्या कारणातून झालेल्या वादातून पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्यात केली. ही घटना शनिवारी (दि.18) पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील सिंहगड व्हिलामध्ये घडली. प्रतिक्षा सरवदे (वय 23, रा. आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी, भारती विद्यापीठ पोलिसांनी पती गहिनीनाथ अंबादास सरवदे ( वय 33 ) याला अटक केली असून, त्याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वडील प्रकाश पिसे ( वय.55,रा.बीड ) यांनी फिर्याद दिली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक सचिन धामणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गहिनीनाथ आणि प्रतिक्षा यांचे जानेवारी 2019 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत होते. 28 ऑगस्टला गहिनीनाथने पत्नीसाठी पाणीपुरी आणली होती. मात्र, पत्नीने पाणीपुरी खाल्ली नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले.

वादातून प्रतिक्षाने राहत्या घरात विष प्राशन केले. त्यानंतर तिला तात्कळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान प्रतिक्षाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तसेच आरोपी पती हा पत्नी प्रतिक्षा हिचा सासरी नांदत असताना, तिला पुणे येथे नेत नव्हता. दरम्यान पती गहिनीनाथ पत्नी प्रतिक्षाला शिवीगाळ व हाताने मारहाण करून शारिरीक व मानसिक त्रास देत होता. त्या कारणातून प्रतिक्षा हिने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -