पहलगाम हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड
“एका समूहाने स्वत:ला TRF म्हणत पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संघटना आहे. हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले आहेत”,अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
“पहलगाम हल्ला काश्मीरमधील स्थिती बाधित करण्यासाठी होता”
“पहलगाममधील हल्ला हा अत्यंत निर्दयी होती. कुटुंबीयांच्या समोर पर्यटकांना गोळ्या झाडल्या गेल्या. हा हल्ला स्पष्टपणे जम्मू-काश्मीरमधील सामान्य स्थितीला धक्का पोहोचवण्यासाठी होता. तिथल्या पर्यटनाला नुकसान पोहोचवण्यासाठी होता. तिथल्या विकास आणि प्रगतीला नुकसान पोहोचवायचं होतं,” असं पत्रकार परिषदेत म्हटलं गेलं.
पत्रकार परिषदेत सुरुवातीला भारतीयांवरील दहशतवादी हल्ल्यांची दृश्ये दाखवली
भारतीय सैन्य, परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सुरुवातीला भारतीयांवरील दहशतवादी हल्ल्यांची दृश्ये दाखवण्यात आली.
ऑपरेशन सिंदूरनंतर सांगलीत श्री शिवपतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून जल्लोष साजरा
सांगली – जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युतर म्हणून भारताने ऑपरेशन ‘सिंदूर’ राबवल्याबदल सांगलीत श्री शिवपतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मारुती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी करत आणि साखर पेढे वाटत पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भारतीय सैन्य, परराष्ट्र मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद
भारतीय सैन्य, परराष्ट्र मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होईल. या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
वाघाने फक्त पंजा उगारलेला आहे अजून जबडा उघडायचा आहे- राज्यमंत्री योगेश कदम
वाघाने फक्त पंजा उगारलेला आहे अजून जबडा उघडायचा आहे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री योगेश कदम यांनी एअर स्ट्राईकवर दिली आहे. “आपण POK आता ताब्यात घेतलं पाहिजे. पाकिस्तानचा जो दहशतवाद्यांना आश्रय देऊन भारताला त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे तो कायमस्वरुपी संपवला पाहिजे,” असंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात तणावाचं वातावरण, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मध्यरात्रीनंतर जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात वुयान, पंपोर भागात अज्ञात लढाऊ विमानाचे अवशेष सापडले असून, स्थानिक नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गर्दी केलीये. या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याने पूंछ, राजौरी जिल्ह्यांतील नियंत्रण रेषेवर (LoC) असलेल्या कृष्णा घाटी, शहापूर, मानकोट, लम, मंजाकोट आणि गमबीर ब्राह्मणा गावांवर जोरदार तोफगोळ्यांचा मारा केलाय. सध्या सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी- गुलाबराव पाटील
“रात्री 9 ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आला आहे. 26 निरअपराध लोकांना मारल्यानंतर जनतेची भावना होती की पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. मी पंतप्रधानांचे अभिनंदन करतो, कारण देशाला याची गरज होती. ती गरज ओळखून ज्याप्रमाणे हल्ला केला ती निश्चितच स्वागतार्ह आहे. संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली.
पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशी यांच्या सासऱ्यांची प्रतिक्रिया
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचे सासरे जयंत भावे यांनी देखील ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली. “भारताने जी कारवाई केली ती अतिशय योग्य आहे. या कारवाईची आम्ही वाट पाहत होतो. ज्या लोकांना प्राण गमवावा लागला त्यांना आज खरी श्रद्धांजली मिळाली. या कारवाईमुळे आतंकवाद कमी होण्यास नक्कीच मदत होईल,” असं भावे म्हणाले.
लष्कर ए तोयबाच्या 2 मोठ्या कमांडरचा खात्मा
लष्कर ए तोयबाच्या 2 मोठ्या कमांडरचा खात्मा झाला आहे. मुदस्सीर आणि हाफीज अब्दुल मलिक हे दोघ ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मुरीदके येथे झालेल्या हल्ल्यात हे दोन कमांडर मारले गेले.
आज सगळा देश AIR फोर्स च्या पाठीमागे – शरद पवार
गेल्या आठवड्यात जे काही घडले त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थ होते. लोक पलीकडून येतात हल्ला करतात, यामध्ये कुठल्या सरकारला बघ्याची भूमिका घेता येत नाही. जो काश्मीरचा भाग पाकिस्तान घेतला तिथं हल्ला केला. या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत, तिथं दारूगोळा ठेवला जातो. पाकिस्तानची बॉर्डर आपण ओलांडून गेलो नाही ती काळजी हवाई दलाने घेतली. आज सगळा देश AIR फोर्स च्या पाठीमागे आहे, अशी आमची भूमिका – शरद पवार
पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये – एकनाथ शिंदे
भारताने 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे. पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये. यापुढेही लष्कर हे दहशतवादी हल्ले नेस्तनाबूत करेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला इशारा
दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही – जयंत पाटील
आपल्या सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी अढळ निर्धार दाखवला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला करत भारतीय सैन्याने दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.
आम्ही आमच्या सैनिकांच्या आणि आमच्या राष्ट्राच्या समर्थनात एकजूट आहोत. दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. जय हिंद – अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
पाकिस्तानाकडून हल्ल्याबाबत निवेदन जारी
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून निवदेन जारी करण्यात आले आहे. पाक लष्कराच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात ८ लोकांचा मृत्यू झाला असून ३३ लोक जखमी झाले आहेत. पाकिस्ताा ६ ठिकाणी २४ क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पंजाबमध्ये आज मॉक ड्रील, किती वाजता ब्लॅकआऊट?
भारताच्या हवाई हल्ल्यात पाक आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर आज पंजाबमधील काही जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. अमृतसरमध्ये रात्री १०:३० ते ११:०० वाजता, पठाणकोटमध्ये दुपारी ४:०० आणि रात्री १०:०० वाजता फाजिल्कामध्ये सकाळी ११:०० आणि रात्री १०:३० वाजता तर गुरुदासपूर आणि फिरोजपूरमध्ये रात्री ९:०० ते ९:३० दरम्यान मॉक ड्रिल होईल.