टाकवडे ता. शिरोळ येथे ग्रामपंचायत समोर विनापरवाना छ. शिवाजी महाराजांचा पुतळा विरोध झुगारून प्रांताधिकारी सौ. मोसमी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तणावपूर्ण वातावरणात पोलिस बंदोबस्तात पुतळा काढून सुरक्षितस्थळी हलवण्यात आला. यावेळी पोलीस व युवकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले प्रशासनाविरुद्ध नागरिकांनी घोषणा दिल्या.
त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. संतप्त जमावाने होणारा ऊरूस बंदची हाक दिली. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जमावाने शासनाच्या कार्यवाहीला विरोध दर्शविला व घोषणाबाजी केली. गावातून निषेध फेरी काढून टायर पेटवून गावातील मुख्य रस्ते बंद केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.
मंगळवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी ग्रामपंचायत समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा बसविला होता. ही माहिती प्रशासनास मिळताच, पोलीस व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. विनापरवाना पुतळा बसवल्याने ग्रामपंचायत प्रशासन व नेतेमंडळी यांना बोलवून प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी पुतळा काढून घेण्यास सांगितले. परंतु पुतळा काढण्यास नकार दिल्याने प्रशासनाने पुतळा सुरक्षित काढून तहसील कार्यालयात सुरक्षितस्थळी
ठेवला आहे. यामुळे गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. याप्रंसगी पोलीस व नागरिकांमध्ये झटापट झाली.
गावांमध्ये सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले, जयसिंगपूर डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळंके, तहसीलदार अनिलकुमार होळकर, शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, गटविकास अधिकारी नारायण घोलप, सार्वजनिक बांधकाम बी. डी. चाचुरडे, ग्रामसेवक सर्कल तलाठी पोलीस पाटील उपस्थित होते