दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर एका नेत्याने गाडीतून उतरून एका महिलेसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.या नेत्याला राष्ट्रीय सरचिटणीस पदावरूनही काढून टाकण्यात आले आहे. या नेत्याच्या लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील हा नेता त्याच्या मैत्रीणीसोबत प्रवास करीत होता. त्याने रात्री एक्स्प्रेसवेवर कार थांबवून हे अश्लाघ्य कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील सत्तारुढ पार्टीचा हा नेता आहे. या व्यक्तीची ओळख पटली आहे. ही कार उज्जैन येथील धाकड येथील मनोहरलाल धाकड यांची आहे. धाकड महासभेने प्रसिद्धी पत्रक काढून या नेत्याला तडकाफडकी बडतर्फ केले आहे. त्याची पत्नी ही भाजपाच्या पाठींब्यावर जिल्हा पंचायत सदस्य झाली आहे. मंदसौर जिल्हा पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक -८ चे ती प्रतिनिधीत्व करते.
भाजपा जिल्हाध्यक्षांचा खुलासा
वाहतूक विभागाच्या नोंदीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारी पांढऱ्या रंगाची कार मनोहरलाल धाकड यांच्या नावावर रजिस्टर आहे. मंदसौर भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेश दीक्षित यांनी एका न्यूज एजन्सीला सांगितले की मनोहरलाल धाकड बनी गावातले आहेत. ते भाजपाचे प्राथमिक सदस्य नाहीत. त्यांची पत्नी जिल्हा पंचायत सदस्य आहेत. त्यांनी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पक्षाच सदस्यत्व घेतले आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. दीक्षित यांनी सांगितले की असे मी असे ऐकले आहे की हा व्हिडीओ दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा आहे.
BJP चे प्राथमिक सदस्य नाहीत
भाजपा हा अनुशासन असलेला पक्ष आहे. जर कोणी चुकीचे वागले असेल तर त्याच्यावर कारवाई होतच असते.या प्रकरणात प्रदेश नेतृत्वाने स्पष्ट केलेले आहे की मनोहरलाल धाकड हा भाजपाचा प्राथमिक सदस्य देखील नाहीए असे BJP चे प्रदेश प्रवक्ते यशपाल सिंह सिसोदिया यांनी या प्रकरणावर एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे.