Saturday, February 14, 2026
Homeब्रेकिंगएका लाखाचे बनले दीड कोटी! ‘या’ म्युच्युअल फंडामुळे गुंतवणूकदार बनले मालामाल

एका लाखाचे बनले दीड कोटी! ‘या’ म्युच्युअल फंडामुळे गुंतवणूकदार बनले मालामाल

भारतातील अनेक मध्यवर्गीय लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हे सर्वात सुरक्षित मानले जाते. यामुळे अनेक लोक मालामाल बनले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहे. सेन्सेक्स ८१,००० हजारांच्या आसपास व्यव्हार करत आहे. तर निफ्टी ५० ही २४ हजारांच्या आसपास व्यव्हार करत आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्येही थोडाफार बदल होताना दिसत आहे. आज आपण एका म्युच्युअल फंड योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात

 

एका लाखाचे बनले दीड कोटी

फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंडने गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. हा फंड सप्टेंबर १९९४ मध्ये लाँच झाला होता. या फंडाने बँकांमध्ये २७.७० टक्के, टेलिकॉममध्ये ८.२९ टक्के, फार्मा आणि बायोटेकमध्ये ५.११ टक्के आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ४.२० टक्के गुंतवणूक केलेली आहे. तसेच फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंडने लाँच झाल्यापासून वार्षिक १८ टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे जर एखाद्या गुंतवणूकदाराने फंड लाँच झाला त्यावेळी फक्त १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे १.५८ कोटी रुपये बनले असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -