किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगडावरील हाच सोहळा आटोपून परतीचा प्रवास करणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे.
माणगावजवळील बोरवाडी गावाच्या हद्दीत अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात शिवप्रेमी गंभीर जखमी झाले आहेत.
शिवराज्याभिषेकाला संपूर्ण महाराष्ट्रातून शिवप्रेमी येत असतात. या सोहळ्यामागे अनेकांच्या वेगवेगळ्या भावना असतात. यंदाही 352 व्या शिवराज्याभिषेकाला किल्ले रायगडावर हजारो शिवप्रेमी आले होते. रायगडावरील हा शिवराज्यभिषेकाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर शिवप्रेमी परतीच्या मार्गावर निघाले.
रायगडावरील हाच शिवराज्यभिषेक सोहळा आटोपून घरी परतणाऱ्या शिवप्रेमींच्या एका वाहनाचा अपघात झाला. बोरवाडी गावाजवळ या शिवप्रेमींच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन शिवप्रेमींना गंभीर दुखापत झाली आहे. तर दोन शिवप्रेमी किरकोळ जखमी झाली आहे.
अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या जखमींवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरु आहेत. रायगडच्या निजापूरदरम्यान अवघड वळणावर चालकाचं जीपवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर जिप रस्त्यावर उलटली. या भयंकर अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अपघातानंतर काहींनी पोलिसांना माहिती दिली. त्याचबरोबर अपघातानंतर जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नांदेडमध्ये भीषण अपघात
नांदेड शहरात समाजकल्याण कार्यालयासमोर दुचाकी आणि पिकपमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. तर एका जणांच्या डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना विष्णुपुरी येथील रुग्णालय उपचारासाठी पाठवलं. गंभीर जखमी हे दोघेही बिलोली तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.