Homeकोल्हापूरहायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; वाशीतील लॉजवर छापा

हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; वाशीतील लॉजवर छापा

वाशी येथील एका लॉजवर हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर करवीर पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली.

संशयित शहाजी एकनाथ वैद्य ऊर्फ सागर पाटील हा व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवून त्यांना बोलावून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच पद्धतीने त्याने कणेरीबाडी येथील एका लॉजमध्येही कुंटणखाना चालविल्याची माहिती समोर आली. लॉज मालक अमोल श्रीपती खोत (वय ४०, रा. कणेरीवाडी, ता. करवीर) याला अटक केली. न्यायालयाने त्याला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. वाशी येथील लॉजवर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुणे आणि मुंबई येथून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या महिलांना कणेरीबाडी येथील लॉजमध्ये ठेवून कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती तपासात पुढे आली. पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार, सहायक फौजदार राहुल देसाई, हेड कॉन्स्टेबल विजय तळसकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अविनाश कांबळे यांनी तपास केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -