Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रFlipkart June Epic Sale 2025 : स्वस्तात घ्या Mobile, Laptop; Flipkart सेल...

Flipkart June Epic Sale 2025 : स्वस्तात घ्या Mobile, Laptop; Flipkart सेल आजपासून सुरु

सिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी जून एपिक सेल सुरू केला आहे. आज म्हणजे १२ जूनपासून ते १८ जून पर्यंत म्हणजेच १ आठवडा हा सेल सुरु राहणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ग्राहकांना मोबाईल, लॅपटॉप, फ्रिज ते वॉशिंग मशीन पर्यंत अनेक वस्तूंवर बम्पर डिस्काउंट देण्यात आला आहे. त्यामुळे अगदी कमी किमतीत आपल्याला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळाली आहे. फ्लिपकार्टच्या या जून एपिक सेल मध्ये कोणत्या प्रमुख वस्तूंवर किती रुपयांची सूट आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

 

स्मार्टवॉचवर ८०% पर्यंत सूट–

आजकाल स्मार्टवॉच वापरणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे, मात्र इतर घड्याळाच्या तुलनेत स्मार्टवॉचची किंमत जास्त असल्याने अनेकजण इच्छा असूनही ते खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता फ्लिपकार्टच्या जून एपिक सेलमधून ग्राहकांना स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करता येईल. स्मार्टवॉचवर तुम्हाला ६८ टक्के ते ८० टक्के डिस्काउंट देण्यात आला आहे. तुम्हाला बँक ऑफर्सचा लाभही घेता येईल.

 

लॅपटॉपवर ४४% पर्यंत सूट– Flipkart June Epic Sale 2025

फ्लिपकार्टच्या जून एपिक सेलमध्ये (Flipkart June Epic Sale 2025) तुम्ही कमी पैशात लॅपटॉप खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्हाला तब्बल ४४ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. तुम्ही Asus, HP, Lenovo, Dell सारख्या नामांकित कंपन्यांचा लॅपटॉप घेऊ शकता. वेगवेगळ्या मॉडेल नुसार, लॅपटॉपच्या किमती आणि त्यावर देणारा डिस्काउंट सुद्धा वेगळा असेल.

 

मोबाईलवरही बम्पर डिस्काउंट-

स्मार्टफोन हा आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनली आहे, एकवेळ काही नसलं तरी चालेल पण जवळ मोबाईल पाहिजे असं अनेकांना वाटत. तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. जून एपिक सेलमध्ये (Flipkart June Epic Sale 2025) अनेक मोबाईल वर सूट देण्यात आली आहे. नथिंग्ज सीएमएफ फोन २ प्रो या प्रसिद्ध मोबाईल वर १६-१७ टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. तसेच Realme P35 5G वर २० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. इथेही वेगवेगळ्या ब्रँड नुसार, मोबाईलच्या किमती आणि त्यावर देणारा डिस्काउंट वेगळा असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -