खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निराश करणारी बातमी आहे. इथून पुढे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये १० तास काम करावं लागणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेश मधील उद्योग आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचं बोललं जातंय. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना डोक्याला हात लावायची वेळ आली आहे. यापूर्वी तेलंगणा राज्यात ऑफिस वर्क ड्युटी ९ तासांची होती.
आंध्र प्रदेश सरकारने कायद्याच्या धारा 54 अंतर्गत हा बदल केला आहे. यापूर्वी आंध्र प्रदेशातील ऑफिस कामाची वेळ ९ तासांची होती, आता त्यामध्ये आणखी १ तास वाढवून ती १० तास केली (10 Hours Office Work) आहे. यापूर्वी सलग 5 तास काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना 1 तासाचा ब्रेक मिळायचा. मात्र आता 6 तास सलग काम केल्यानंतर ब्रेक मिळेल. याशिवाय, ओव्हरटाइमच्या मर्यादेतही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी महिन्याला 75 तास ओव्हरटाइम करता येत होता, आता ती मर्यादा वाढवून 144 तास करण्यात आली आहे. राज्यातील उद्योग आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
महिला कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय – 10 Hours Office Work
महिला कर्मचाऱ्यांबाबत सुद्धा आंध्र प्रदेश सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत आंध्र प्रदेशात महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने हा नियम शिथील केला आहे. त्यामुळे आता खासगी कंपन्यांना महिलांना रात्रीच्या वेळी काम करावे लागेल. मात्र, नाईट शिफ्टमध्ये महिला कर्मचाऱ्यांना परवानगी, वाहतूक आणि त्यांची सुरक्षा या सगळ्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
कर्मचाऱ्यांचा विरोध-
दरम्यान, १० तास काम करण्याच्या (10 Hours Office Work) सरकारी आदेशाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. सरकारच्या अशा धोरणांमुळे कर्मचाऱ्यांचं रुपांतर गुलामांमध्ये होईल, मालक कर्मचाऱ्यांना आणखी २ तास म्हणजेच जवळपास १२ तास काम करायला लावतील अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरुद्ध तीव्र विरोध करण्यात येतोय.