Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्र‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून जेठालाल बबिताची एक्झिट? 

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून जेठालाल बबिताची एक्झिट? 

17 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आणि प्रत्येक घरातली हसण्याची हमखास डोस बनलेली ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका(serial) सध्या चर्चेचा विषय ठरतेय. याचे कारण म्हणजे मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक – ‘जेठालाल’ आणि ‘बबीता जी’ – काही एपिसोड्सपासून गायब आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रेक्षकांमध्ये निराशा आणि संभ्रम निर्माण झाला आहे.

 

सध्या मालिकेत(serial) ‘भूतांचा ट्रॅक’ सुरू आहे, जिथे गोकुळधाम सोसायटीमधील रहिवासी एका हॉलिडे होममध्ये गेले आहेत. या बंगल्याभोवती फिरणाऱ्या भूतांच्या अफवा, रहस्यमय घटना आणि गोंधळाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण या ट्रॅकमध्ये जेठालाल, बबीता जी आणि अय्यर तिघेही अनुपस्थित आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं असून, अनेक चाहते विचारत आहेत – “या कलाकारांनी शो सोडला का?”

 

 

यावर अखेर शोच्या प्रोडक्शन हाऊसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की:

 

दिलिप जोशी उर्फ ‘जेठालाल’ सध्या व्यवसायाच्या कामासाठी बाहेर गेले आहेत.

मुनमुन दत्ता म्हणजेच ‘बबीता जी’ अजूनही शोचा भाग आहेत.

तनुज महाशब्दे म्हणजे ‘अय्यर’ हे बबीता जींसोबत महाबळेश्वरला सुट्ट्या घालवत असल्याचं कथानकात दाखवलं आहे.

 

यामुळे सध्या काही काळासाठी ही तिकडी मालिकेतून दूर असली, तरी ते शो सोडून गेलेले नाहीत, हे स्पष्ट होतं. प्रेक्षकांनी आता धीर धरावा, कारण लवकरच आपल्या आवडत्या पात्रांची पुनरागमन होण्याची शक्यता आहे. ‘तारक मेहता’चा हास्याचा ट्रॅक पुन्हा एका धमाक्याने सुरू होईल, अशीच आशा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -