Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रपुढच्या सीटवर कोण बसणार? बाप-लेकामध्ये वाद, वडिलांची गोळ्या झाडून हत्या; मुलाला अटक

पुढच्या सीटवर कोण बसणार? बाप-लेकामध्ये वाद, वडिलांची गोळ्या झाडून हत्या; मुलाला अटक

दिल्लीतील तिमारपूर इथं एक धक्कादायक अशी घटना घडलीय. २६ वर्षीय तरुणाने कारमध्ये पुढच्या सीटवर बसण्यावरून वडिलांची गोळ्या झाडून हत्या केलीय. तरुणाचे वडील सीआयएसएफमधून निवृत्त उपनिरीक्षक होते.

 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने उत्तराखंडमधील मूळ गावी जाण्यासाठी कार भाड्यानं घेतली होती. मुलानेच वडिलांची गोळ्या झाडून हत्या केलीय. मुलाचं नाव दीपक असं आहे. त्याला घटनास्थळावरून अटक करण्यात आलीय. तर या गुन्ह्यात वापरण्यात आलेली बंदूक आणि ११ काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.

 

गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. तिमारपूरच्या एमएस ब्लॉकमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय. पोलीस गस्त घालत असताना अचानक पोलीस कर्मचाऱ्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर मुलाचे वडील रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळलं.

 

मुलाने हत्या केलेल्या वडिलांचं नाव सुरेंद्र सिंह असं आहे. ते सीआयएसएफमधून निवृत्त झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरेंद्र सिंह यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांना मृत घोषित केलं.

 

सहा महिन्यांपूर्वीच सुरेंद्र सिंह निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर गावी राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. एक कार भाड्यानं घेऊन त्यात सामान भरून ते गावी निघाले होते. यावेळी सुरेंद्र आणि त्यांचा मुलगा दीपक यांच्यात पुढच्या सीटवर कोण बसणार यावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला गेला की रागातून दीपकने वडिलांवर गोळ्या झाडल्या. त्यांच्या गालावर गोळी लागली होती. तसंच चेहऱ्यावरही छर्रे घुसले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलगा दीपकला अटक केली असून अधिक चौकशी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -