मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट रेल्वे गाड्यांच्या विविध वर्गांमध्ये भारतीय रेल्वेने प्रवासी भाडे दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही भाडेवाढ १ जुलैपासून लागू होत असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.
रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वातानुकूलित आणि गैर-वातानुकूलित या दोन्ही प्रकारच्या डब्यांमध्ये भाडेवाढ लागू केली आहे. एसी चेअर कार, एसी थ्री टियर, थ्री इकॉनॉमी, एसी टू टियर, एसी फर्स्ट क्लास आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये किलोमीटर दोन पैसे भाडेवाढ जाहीर करण्यात आली आहे. तर मेल आणि एक्सप्रेस गैर-वातानुकूलित डब्यांमध्ये सेकंड क्लास, स्लीपर क्लास आणि फर्स्ट क्लाससाठी प्रति किलोमीटर एक पैशाची भाडेवाढ करण्यात आली आहे.
रेल्वेने जनरल डब्यातील सेकंड क्लास सामान्य प्रवासासाठी ५०० किलोमीटरपर्यंत कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. ५०१ ते १५०० किलोमीटरसाठी ५ रुपये, १५०१ते २५०० किमीसाठी १० रुपये आणि २५०१ ते ३००० किमीसाठी १५ रुपये इतकी करण्यात आली आहे. तर, फर्स्ट क्लास सामान्य आणि स्लीपर क्लास सामान्यमध्ये प्रति किलोमीटर अर्धा पैसा भाडेवाढ लागू होईल.
लोकल आणि सीझन तिकीटधारकांना दिलासा
रेल्वेने उपनगरीय (लोकल) गाड्या आणि मासिक/त्रैमासिक (चडढ/टडढ) धारक प्रवाशांना या भाडेवाढीतून वगळले आहे. अधिसूचनेनुसार, उपनगरीय आणि सीझन तिकीट दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे, या भाडेवाढीचा कोणताही परिणाम होणार नाही.
सर्व विशेष गाड्यांच्या दरात वाढ
रेल्वेने तेजस, राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, हमसफर, अमृत भारत, महामना, गतिमान, अंत्योदय, गरीब रथ, जन शताब्दी, युवा यांसारख्या सर्व विशेष गाड्यांमधील सामान्य सेवा, अनुभूती कोच आणि एसी व्हिस्टाडोम कोचच्या श्रेणी-निहाय मूळ भाड्यात सुधारित दरपत्रकानुसार वाढ केली आहे.
वाढीव १ जुलैपासूनच लागू
रेल्वे मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, वाढीव भाडे १ जुलैपासून लागू केले.Increase in railway fares मात्र, ज्या प्रवाशांनी ३० जूनपूर्वी आपले तिकीट आरक्षित केले आहे आणि त्यांचा प्रवास १ जुलै नंतरचा आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
तत्काळच्या नियमात बदलभारतीय रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमात मोठा बदल केला आता आपल्याला आधार कार्ड आणि ओटीपीशिवाय तत्काळ तिकिट बुक येणार नाही.Increase in railway १ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार आधारित ओटीपी आवश्यक असणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.





