गर्भवतीला ठार मारण्याची धमकी देणार्या भादोले (ता. हातकणंगले) येथील प्रियकरावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. योगेश प्रफुल्ल जाधव (वय 37) असे त्याचे नाव आहे.विवाहाचे आमिष दाखवून जाधव याने संबंधित महिलेबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. संबंधित गर्भवतीने त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, अशी फिर्यादी महिला आणि आरोपी जाधव हे गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. जाधव याने फिर्यादी महिलेला स्वतःच्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर सुमारे आठ वर्षे संबंधित फिर्यादी महिलेशी जाधव याच्या घरी व रिसॉर्टवर वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर संबंधित फिर्यादी महिला गर्भवती राहिल्यानंतर त्यांनी जाधव याला त्याची कल्पना दिली. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार नाही, तू केस केलीस, तर लईत लई तीन महिने मी आत राहीन. त्यानंतर मी बाहेर आल्यावर तू माझ्या हातून राहत नाहीत, असे म्हणून जाधव याने ठार मारण्याची धमकी दिली.