Saturday, July 12, 2025
Homeमहाराष्ट्रकृत्रिम विसर्जन टाक्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू : नागरिकांची झोनल कार्यालयावर धडक

कृत्रिम विसर्जन टाक्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू : नागरिकांची झोनल कार्यालयावर धडक

गणेश विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टाक्यात बुडून एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या मुलाचे नाव महेश कोमल थापा (वय 7) असे आहे. लकडगंज अग्निशमन केंद्र अंतर्गत कच्ची विसा ग्राउंड येथे ही घटना घडली.

 

मोकळ्या मैदानात असलेल्या या टाक्यात पावसाचे पाणी साचल्याने मुलाचा मृत्यू झाला. मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष यास कारणीभूत ठरल्याचा आरोप संतप्त कुटुंबीय, नागरिकांनी झोनल कार्यालयावर धडक देत केला. गणपती विसर्जन करण्यासाठी बनवलेल्या टाक्यांमध्ये खेळता खेळता दोन-तीन मुले पाण्यात बुडली.

 

दरम्यान, इतर मुले बाहेर आली एक मुलगा टाक्यामध्ये बुडाला. मनपा अग्निशमन विभागाने धाव घेतली. एका अग्निशमन जवानाने मुलाला बाहेर काढून रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -