Saturday, July 26, 2025
Homeकोल्हापूरराधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले!

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले!

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण पूर्ण भरले असून. २५ जुलै रोजी रात्री १० वाजता धरणाचे दोन स्‍वयंचलीत दरवाजे उघडले आहेत.

 

दरवाज क्र. 6 व 3 मधून 2856 क्‍युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. यासह पॉवर हाऊस मधून 1500 cusec असा एकूण 4356 cusec इतका एकूण विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.

 

धरण 347.50 फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. शुक्रवारी सांयकाळी धरणाची पाणी पातळी 346.90 फूट झाली होती. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अर्धा फूट पाणी कमी होते. पण सांयकाळनंतर पावसाचा जोर कायम राहिल्‍याने रात्री उशिरा धरण पाणी पातळी 347.50 फूट झाली व त्‍यांनतर रात्री दहाच्या सुमारास दोन स्‍वयंचलित दरवाजे खुले झाले.

 

शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात 65 मिमी तर दुपारी चार वाजता संपलेल्या दहा तासात 37 मिमी पावसाची नोंद झाली असूम जुनपासून आज अखेर 3083 मिमी पाऊस झाला आहे. धरणाची पाणी पातळी 347.50 फूट असून 8.24 टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -