एक धक्कादायक अशी घटना उघडकीस आली असून 17 आठवडे प्रेग्नंट असलेल्या पत्नीला चक्क उंच डोंगरावरून पतीने ढकलून दिले. पत्नीचा मृत्यू झाला म्हणून आनंदात असलेल्या पतीची भांडाफोड झाली आणि कोणीही विचार करू शकणार नाही असे घडले. पत्नी ही वकील होती आणि दोघांची पहिली भेट एका चष्माच्या दुकानात झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दररोज वाद होत होती, लग्नानंतर पतीचे खरे रूप तिच्यासमोर आले आणि तिने विभक्त होण्याचे मनात ठरवले होते.
स्कॉटलॅंडच्या आर्थर सीटच्या उंच डोंगरावर काशिफ अशरफ नावाचा व्यक्ती पत्नी फाैजिया हिला घेऊन फिरण्यासाठी आला गेला. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होता, त्याने अनेकदा पत्नीला शिवीगाळ करत मारहाण देखील केली. यानंतर फाैजिया हिने अशरफला घटस्फोट देण्याचे मनात निश्चित केले होते आणि ती वैतागली होती.
फाैजियाने अशरफ हा आपल्यासोबत नेमका कसा वागतो हे तिच्या आईला सांगितले होते. फाैजियाने अशरफपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलाच असताना ती प्रेग्नेंट झाली. यामुळे तिने मनात कुठेतरी या नात्याला एक संधी देण्याचा विचार केला. यानंतर दोघेजण आर्थर सीटच्या डोंगरांवर फिरण्यासाठी गेले. दरम्यान तिथेच दोघांमध्ये जोरदार वादाला सुरूवात झाली.
अशरफने अगोदर शिवीगाळ करण्यास सुरूवात केली आणि आजुबाजूला कोणीही नसल्याचा फायदा घेत थेट फाैजियाला उंच डोंगरावरून खाली फेकून दिले. 15 मीटर खाली जाऊन फाैजिया एका डोंगरावर उडकून बसली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, असे असतानाही फाैजियाने हार मानली नाही आणि कोणीही साधा विचार देखील करणार नाही, असे काम तिने केले.
फाैजिया ही जोरजोरात ओरडत होती. डोंगरावर फिरणाऱ्या दानिया रफीकची नजर तिच्यावर पडली आणि तिने याबद्दलची माहिती ही पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता फाैजिया ओरडून सांगत होती की, माझ्या पतीला माझ्याजवळ येऊ देऊ नका…त्यानेच मला धक्का दिला आहे…माझ्या पोटातील बाळाला काही होणार नाही ना? असेही ती सतत विचारत होती. पोलिसांनी अनेक प्रयत्न करूनही फाैजियाला वाचवण्यात यश मिळाले नाही. कोर्टाने अशरफला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.