Sunday, July 27, 2025
Homeक्रीडाजसप्रीत बुमराह निवृत्त्त होणार?? भारतीय क्रिकेटला झटका

जसप्रीत बुमराह निवृत्त्त होणार?? भारतीय क्रिकेटला झटका

भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहबाबत एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह हा लवकरच कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होऊ शकतो मत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad kaif) याने व्यक्त केलं आहे. बुमराह हा सध्या दुखापतींशी झुंज देतोय. परंतु तो स्वाभिमानी आहे. ज्या दिवशी त्याला समजेल कि त्याच शरीर भारतीय संघासाठी आणि देशासाठी १०० टक्के साथ देत नाही त्याच दिवशी तो स्वतःहून थांबण्याचा निर्णय घेईलअसं मोहम्मद कैफ ने म्हंटल आहे. याबाबत एक विडिओ कैफने शेअर केला आहे.

 

बुमराहचे बॉलिंग स्पीड कमी झालं- Jasprit Bumrah

लॉर्ड्स कसोटी सामन्यात ७ बळी घेणारा भारतीय संघाचा हा वेगवान गोलंदाज मँचेस्टर कसोटी सामन्यात पूर्णपणे फिका दिसत होता. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध फक्त एकच बळी घेऊ शकला आहे. संपूर्ण खेळात तो आपली लय शोधण्यासाठी संघर्ष करत असल्याचे दिसून आले. महत्वाची बाब म्हणजे बुमराहचे बॉलिंग स्पीड सुद्धा कमालीचे कमी झालं आहे. यामुळेच कैफने बुमराहच्या निवृत्तीबाबत शंका उपस्थित केली आहे.

 

मोहम्मद कैफ म्हणाला, बुमराह लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. मला वाटते की तो आगामी कसोटी सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही आणि तो निवृत्तही होऊ शकतो. बुमराह दुखापतींशी झुंजत आहे. म्हणूनच तो त्याच्या लयीत दिसत नाही. परंतु तो एक स्वाभिमानी व्यक्ती आहे, जर त्याला वाटत असेल की तो त्याचे शंभर टक्के योगदान देऊ शकत नाही, देशासाठी सामना जिंकू शकत नाही, तर तो स्वतः खेळण्यास नकार देईल.

 

कैफ पुढे म्हणाला की विकेट न मिळणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु मँचेस्टर कसोटीत बुमराह (Jasprit Bumrah) ज्या वेगाने गोलंदाजी करत होता तो वेग खूपच कमी होता. मँचेस्टर कसोटी सामन्यात त्याच्या चेंडूवर पुढे डायव्ह करून विकेटकीपरने घेतलेला झेल हेच सांगतो कि जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नाही. कारण बुमराह जेव्हा फिट असतो तेव्हा विकेटकिपर झेल घेताना बॉल त्याच्या छातीपर्यंत उसळी घेत असतो. बुमराहचा चेंडू ईतक्या वेगाने झिप करतो कि फलंदाजांची भंबेरी उडते.. मग तो रूट असो किंवा बेन स्टोक्स, कोणीही येऊ द्या. बुमराह असा गोलंदाज आहे जो केव्हाही फलंदाजाला बाद करू शकतो.

 

 

बुमराहमध्ये अजूनही जोश आहे, देशासाठी खेळण्याची इच्छा आहे परंतु शरीर त्याला साथ देत नाही… शरीरापुढे तो हरला आहे, त्यामुळे पुढच्या कसोटी सामन्यांमध्ये सुद्धा त्याच्यासमोर अडचणी येतील. आधी रोहित गेला, मग विराट आणि अश्र्विन गेला… आता कदाचित बुमराहचा नंबर असू शकतो … मी प्रार्थना करतो की मी जे म्हणतोय ते चुकीचे ठरो असं मोहम्मद कैफने म्हंटल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -