Saturday, July 26, 2025
Homeराजकीय घडामोडीपुन्हा राज गर्जना! मनसेचा रविवारी मुंबईत मेळावा, राज ठाकरे करणार मार्गदर्शन

पुन्हा राज गर्जना! मनसेचा रविवारी मुंबईत मेळावा, राज ठाकरे करणार मार्गदर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे. मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवार 27 जुलै रोजी पार पपडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्याला उपस्थितीत राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी 5 वाजता मेळावा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मनसेच्या या मेळाव्याला मनसेचे नेते, सरचिटणीस तसेच मुंबईतील विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, मुंबईतील सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 

मनसेच्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ज्या कमकुवत बाजू असतील त्या दुरुस्त करण्याचे काम केले जाणार आहे. याबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

 

शिवसेना ठाकरे गट-मनसे युती होणार?

 

शिवसेना ठाकरे गट-मनसेने हिंदी सक्ती विरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र या दोन्ही पक्षांची निवडणूकीबाबत कोणतीही युती अद्याप झालेली नाही. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे युतीबाबत बोलणार का? याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. हे दोन्ही पक्ष जरी एकाच मुद्यासाठी एकत्र रस्त्यावर उतरले होते, मात्र अद्याप त्यांच्या युतीची घोषणा झालेली नाही.

 

परप्रांतिय हिंदी भाषिकांवर भाष्य करण्याची शक्यता

 

मीरा रोड येथील सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतिय हिंदी भाषिकांना गंभीर इशारा दिला होता. कोणी मराठीचा अपमान करत असेल तर त्याच्या कानाखाली जाळ काढा असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला अमराठी व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घडली आहे, त्यामुळे आता या मुद्यावर राज ठाकरे काही बोलणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -