Sunday, July 27, 2025
Homeराजकीय घडामोडीनरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार, उज्वल निकम यांच्या सत्कार सोहळ्यात...

नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार, उज्वल निकम यांच्या सत्कार सोहळ्यात भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभेच्या सदस्यपदी वर्णी लागली, याबद्दल आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात उज्वल निकम यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी आणि भाजपचे नेते राज पुरोहित यांची देखील उपस्थिती होती, या सत्कार समारंभात बोलताना राज पुरोहित यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार असल्याचं पुरोहित यांनी म्हटलं आहे.

 

उज्वल निकम हे राज्यसभेचे खासदार झाले, त्यानिमित्तानं दादर येथील वसंत स्मृती सभागृहात त्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे, या सत्कार समारंभामध्ये बोलताना भाजप नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना विष्णूशी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार असल्याचं पुरोहित यांनी म्हटलं आहे.

 

नरेंद्र मोदी हे न थांबणारे न थकणारे पंतप्रधान आहेत, आपण अमेरिकेला जाऊन आलो की दोन दिवस जेट लॉक लागतो, मोदी फिनलंड, इंग्लंड दौरा करून अहमदाबादमध्ये दोन दिवसांत २२ उद्घाटनं करतात, असं पुरोहित यांनी म्हटलं आहे.

 

निकम यांनी काय म्हटलं?

 

या सत्कार समारंभामध्ये बोलताना निकम यांनी म्हटलं की, मी मराठीत भाषण करणार आहे, याचा अर्थ असा नाही की मला इतर भाषा आवडत नाहीत. मातृभाषा ही महत्त्वाची आहेच, पण इतर भाषा ही बुद्धीची कुवत वाढविण्यासाठी आवश्यक असतात. राज्यसभा सदस्य व राष्ट्रपती प्रतिनिधी म्हणून आपल्याकडून पहिला जाहीर सत्कार होत आहे. शपथ कशी घ्यायची? अध्यक्षांना नमस्कार करून कसे बसायचे? याची रंगीत तालीम तिथल्या अधिकाऱ्यांनी परवाच घेतली. चार ओळींची शपथ मुखोद्गत झाली होती. शपथ मराठी भाषेत घेण्यास सुरुवात केली, त्याठिकाणी सोनियाजी बसल्या होत्या, त्यांना मराठी समजले नसेल म्हणून मी इंग्रजीत सांगितले की ही मराठी भाषा आहे. राजकारण करण्यासाठी काही लोक बेगडी प्रेम दाखवतात. मला राजकारणात यायचे नव्हते, पण देवेंद्र फडणवीस व अमित शाह यांचा आग्रह होता, असं यावेळी निकम यांनी म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, या आधी ही मी काही राजकीय पक्षांना नम्रपणे नकार दिले होते. भाजपने तिकिट दिले तेव्हा मला प्रश्न विचारले , भाजप का निवडला? या पक्षात राष्ट्र व देशाबद्दल जे प्रेम आहे, ते कुठल्याही पक्षात मला दिसले नाही असे उत्तर मी त्यांना दिले. मी काही मतांनी निवडणूक हरलो, मी खटला चालवतो, तेव्हा आरोपी कुठल्या पंथाचा किंवा जातीचा पाहत नाही, पण काही लोक स्वार्थाने प्रेरित असतात, त्यांना राजकारण करायचे असते मी हरलो तेव्हा काही जणांना वाटले मी हरलो, पण मी हरलो होतो, तरी मी विझलो नव्हतो, हा माझा अंत नव्हता, हे त्या बिचाऱ्यांना कळलेच नाही असं म्हणत त्यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -