Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रदुसऱ्या लग्नासाठी सुनेचा माझ्या नातवाला विकण्याचा प्रयत्न, आजीने केलेल्या आरोपाने खळबळ 

दुसऱ्या लग्नासाठी सुनेचा माझ्या नातवाला विकण्याचा प्रयत्न, आजीने केलेल्या आरोपाने खळबळ 

धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे पतीच्या निधनानंतर एका महिलेने दुसरे लग्न करण्यासाठी स्वत:च्या मुलाला दत्तक देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या घटनेने या मुलाच्या आजीने आपल्या नातवाला विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुनेवर केला आहे. सोलापुरातील एका दांपत्याला आपल्या नातवाची विक्री करण्याचा सुनेचा डाव होता असा आरोप आजीने केला आहे.

एका चिमुकल्याला त्याच्या वडीलांच्या निधनानंतर सोलापूरच्या एका दाम्पत्याला विकण्याचा प्रयत्न धाराशिव येथे घडला आहे. या चिमुकल्या मुलाची आई आणि तिच्या मामीने चाळीसगाव इथे आपल्या नातवाची विक्री केल्याचा गंभीर आरोप मुलाची आजी लता तळभंडारे यांनी करीत या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

या चिमुकल्या मुलाच्या आईचं चाळीस गावातील व्यक्तीसोबत दुसरे लग्न झाले आहे. पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर तिला दुसरे लग्न करायचे होते. परंतू पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचे करायचे काय ? म्हणून हे मूल ती दत्तक देत असल्याचा दत्तक करारात उल्लेख आहे. चिमुकल्या मुलाची आई आणि सावत्र वडिलांनी दत्तक करार करीत या मुलाची विक्री केल्याचा सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल आरोप केला आहे.

 

म्हणून माझ्या मुलाने आत्महत्या केली

सुनेने नातवंडाला न दिल्यानेच माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचाही आरोप लता तळभंडारे यांनी केला आहे. आपली सून आणि नातू घरातून गायब झाले असल्याची मिसिंग तक्रारही यापूर्वी धाराशिवच्या मुरूम पोलिसात आजी लता तळभंडारे यांनी दिली होती. त्यानंतर सुनेने दुसरे लग्न आणि नातवाला विक्री केल्याचे समजल्याचे आजीने म्हटले आहे.

 

सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने या चिमुकल्या मुलाला ताब्यात घेत बालकल्याण समितीसमोर हजर केले . आता धाराशिव येथील सरकारी रुग्णालयात या चिमुकल्यावर उपचार सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी म्हटले आहे.

 

गुन्हा नोंद करण्याच्या सूचना

दत्तक करार करत ज्या पालकांना मुलाची विक्री केली. त्या ठिकाणी मूल जुलाब आणि तापाने फणफणलेल्या अवस्थेत आढळल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करीत ही दत्तक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. बालकल्याण समितीने देखील ही मुलगा दत्तकप्रक्रिया बेकायदेशीरपणे झाली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदवत गुन्हा नोंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

चिमुकल्यावर धाराशिव येथे उपचार सुरू

बालकल्याण समितीने धाराशिव येथील सह्याद्री अंकुर शिशुगृहात बाळाला दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र गालफुगी ताप आणि जुलाब असल्याने त्याला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची शिशुग्रह चालक डॉ. दिग्गज दापके यांनी सांगितले. चिमुकल्यावर धाराशिव येथे उपचार सुरू असून सामाजिक कार्यकर्ते आणि मुलाला दत्तक घेणाऱ्या महिलेमध्ये धाराशिवच्या सरकारी रुग्णालयासमोर शाब्दीक चकमक झडल्याचा प्रकारही घडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -