राज्यात यंदा मॉन्सून लवकर दाखल झाला. सुरूवातीला पावसाचा जोर चांगलाच बघायला मिळाला. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागांमध्ये मॉन्सूनचा जोर ओसरल्याचे बघायला मिळतंय. जुलैच्या शेवटी पाऊस कमी होताना दिसला. काही भागांमध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. कोकणासह पुण्यातील काही भागांमध्ये हवामान खात्याने काल अलर्ट जारी केला होता. काही भागांमध्ये काल पावसाने हजेरी लावली.
आता आॅगस्टला सुरूवात झाली असून या महिन्यात पाऊस कसा राहणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. आज भारतीय हवामान खात्याकडून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आलाय. येलो अलर्ट जाहीर करण्यात आला. कोकणाच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस सरासरी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला पाऊस चांगला झाला.
भंडाऱ्यामध्ये मागी काही दिवसांपासून चांगला पाऊस होताना दिसतोय. मात्र, बांध फुटल्याने शेती पाण्यासाखी गेलीये. यामुळे पिंकांचे मोठे नुकसान झाले. पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस चांगला होताना दिसतोय. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसताना दिसतील. राज्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण असेल.
राज्यातील काही भागांमध्ये अजूनही मॉन्सूनची प्रतिक्षा कायम
ऑगस्ट महिन्यापेक्षा सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पंढरपूर उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. उजनी धरणातून 71000 तर वीर धरणातून 31000 क्यूसेक इतके पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. आज अमरावती, भंडारा, गोदिंया, नागपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली याठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. यंदा राज्यात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता. काही भागात पाऊस चांगला झाला आहे.