पृथ्वीच्या गर्भात अनेक रहस्ये लपलेली आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला कित्येक वर्षे माहिती नसते. वेळोवेळी पृथ्वीतून अशा गोष्टी समोर येतात, ज्या पाहून आपण थक्क होतो. कधी कधी या सर्व गोष्टींमुळे अभ्यासकांनादेखील धक्का बसतो. पृथ्वी नेहमीच काही ना काही रहस्यमयी गोष्टी आपल्या गर्भातून बाहेर काढत असते. अशीच एक 1200 वर्षे जुनी मूर्ती धरतीच्या गर्भातून सापडली, जी सोन्याने बनलेली आहे. पण जेव्हा या मूर्तीची तापसणी करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. ही माहिती पाहून डॉक्टरांपासून संशोधकही हैराण झाले. आता नेमकं काय झालं होतं त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया…
1200 वर्षे जुनी मूर्ती
धरतीच्या गर्भातून बाहेर आलेली ही मूर्ती दिसायला सामान्य मूर्तीसारखीच आहे, पण जेव्हा तिची तपासणी केली गेली, तेव्हा आतून जे सापडले ते जाणून तुम्हीही चकित व्हाल. थायलंड, चीन आणि व्हिएतनामसारख्या आशियाई देशांमध्ये गौतम बुद्धांच्या अनेक वर्षे जुन्या मूर्ती सापडत असतात. पण यावेळी सापडलेली ही 1200 वर्षे जुनी मूर्ती, जी महागड्या दगडांनी आणि सोन्याने बनलेली आहे, ती इतर मूर्तींपेक्षा पूर्णपणे वेगळी होती.
नेमकं काय आहे प्रकरण?
वैज्ञानिकांनी या मूर्तीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या मूर्तीचे सीटी स्कॅन केले गेले. स्कॅनमधून जे समोर आले ते पाहून वैज्ञानिक थक्क झाले. ही मूर्ती कोणतीही सामान्य मूर्ती नव्हती, तर तिच्या आत एक ममी होती. यापूर्वीही अनेक देशांमध्ये असे संत होते, ज्यांना समाधीनंतर ममीमध्ये रूपांतरित केले गेले. वैज्ञानिकांनी या मूर्तीची सखोल तपासणी केली तेव्हा असे समोर आले की, एका बौद्ध साधूने साधना आणि तपस्येसाठी स्वतःला भूमिगत खोलीत बंद करून घेतले होते. श्वास घेण्यासाठी त्यांनी बांबूच्या नळीचा वापर केला असावा. त्या बौद्ध साधूने कमल मुद्रेत साधना करताना प्राण सोडले.
ममी बनलेल्या साधूच्या शिष्यांनी 200 वर्षांपूर्वी त्यांचे शरीर नष्ट होऊ नये म्हणून सोन्याने झाकले. पण वैज्ञानिकांना अद्याप हे सिद्ध करता आले नाही की यात सोन्याचा वापर नेमका का केला गेला.