Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरमहादेवी हत्तीणीच्या मुद्यावरून आंदोलक संतप्त, कोल्हापुरातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनजिल्हाधिकारी कार्यालयातून हाकललं

महादेवी हत्तीणीच्या मुद्यावरून आंदोलक संतप्त, कोल्हापुरातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनजिल्हाधिकारी कार्यालयातून हाकललं

अंबानी यांच्या वनतारा प्राणी संग्रहालयातून नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मूक पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पदयात्रेमध्ये पहाटेपासूनच सहभागी न झालेल्या कोल्हापूरमधील काही आजी-माजी लोकप्रतिनिधींना आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी(Collector) कार्यालयात जाऊन धारेवर धरले.

 

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मूक पदयात्रेला शेकडो नागरिकांचा पाठिंबा मिळाला. मात्र, सकाळपासूनच प्रमुख राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला दिसला नाही. यामुळे आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला.

 

 

सकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी (Collector)कार्यालयात काही आजी-माजी लोकप्रतिनिधींनी अचानक हजेरी लावली. मात्र, त्यांचा उपस्थितीचा हेतू केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा आहे, असा आरोप करत आंदोलकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला. “चालत आलात का? आम्ही पहाटेपासून चालत आलोय!” अशा घोषणा देत आंदोलकांनी त्यांना चालते व्हा, अशी मागणी केली.त्यानंतर वातावरण चिघळू लागल्याने आणि आंदोलक आक्रमक होत असल्याचे पाहून संबंधित लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयातून माघार घेणेच पसंत केले.

 

या घटनेनंतर आंदोलकांमध्ये स्पष्ट नाराजी दिसून आली. “सत्तेत असताना आणि सत्तेच्या जवळ असताना हे लोकप्रतिनिधी केवळ फोटोसेशन आणि प्रसिद्धीसाठीच काही अंतर चालतात, पण प्रत्यक्ष कृती मात्र दिसत नाही,” असा थेट आरोप आंदोलकांनी केला.या आंदोलनामुळे महादेवी हत्तीणीच्या मुद्यावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. जनता आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही, ही भावना या प्रसंगातून प्रकर्षाने पुढे आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -