मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच सण-उत्सवांची रेलचेल सुरू होणार आहे.(required) मात्र, दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. वर्गणी गोळा करणाऱ्या सर्व मंडळांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.धर्मादाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही सार्वजनिक सणासाठी वर्गणी गोळा करताना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा, 1950 अंतर्गत कलम 41 क नुसार ही परवानगी घेणे आवश्यक आहे. याचे पालन न केल्यास कारावास आणि दंडाची कारवाई केली जाऊ शकते.
नोंदणी नसलेली मंडळे अशा मंडळांनी प्रत्येक सणासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून तात्पुरती परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी ६ महिन्यांपर्यंत वैध असते.नोंदणीकृत मंडळे यांना वर्गणीसाठी वेगळी परवानगी लागणार नाही. पण त्यांना दरवर्षी हिशोबपत्रक आणि आर्थिक माहिती ऑनलाइन दाखल करणं बंधनकारक आहे.(required)या नियमामुळे सार्वजनिक सणांमध्ये पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त निर्माण होईल, असं प्रशासनाचं म्हणणं आहे.
परवानगी घेण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात:
₹10 कोर्ट फी स्टॅम्प
– मंडळाचा ठराव
– दोन पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र आधार / पॅन
– जागा मालकाचे NOC
– पत्ता पुरावा वीज बिल
– मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास त्याचा आदेश व हिशोब
अर्ज प्रक्रियेचा योग्य वेळी प्रारंभ करून वेळेत परवानगी मिळवणं आवश्यक आहे, अन्यथा वर्गणी गोळा करताना मोठी अडचण येऊ शकते. जर कोणतंही मंडळ धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता वर्गणी गोळा करत असेल, तर त्यांच्यावर कलम 66 क अंतर्गत तीन महिन्यांपर्यंत कारावास आणि जमा रकमेच्या दीडपट दंडाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे नियमानुसार काम करणं अत्यावश्यक आहे.प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या असून,(required) उत्सव काळात कोणतीही गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी मंडळांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.