Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रचारित्र्याच्या संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाèया पतीने पत्नीची कुèहाडीने वार करून हत्या केली. ही घटना यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील रुई येथे बुधवार, 6 ऑगस्ट रोजी घडली.

 

मंदा राहुल डोंगरे असे मृत पत्नीचे नाव असून राहुल डोंगरे असे आरोपीचे नाव आहे.

 

रुई येथे संजू इंगळे यांच्या शेतातील बंड्यावर राखणीकरिता व रोजमजुरीकरिता राहुल श्रीराम डोंगरे, त्याची पत्नी मंदा डोंगरे, तीन मुली व आई वडील राहात होते. राहुल हा पत्नीसोबत नेहमी चारित्र्याच्या संशयावरून व इतर कोणत्या न कोणत्या कारणावरून वाद करीत होता.

 

बुधवारी दुपारी 1.30 च्या समारास राहुल डोंगरे याने पत्नी मंदा ही घरी असताना तिच्या डोक्यावर जिवे मारण्याचे उद्देशाने कुèहाडीने वार करून गंभीर जखमी केले. तसेच बाहेरून दार बंद करून तेथून निघून गेला.

 

त्यांची मोठी मुलगी शाळेतून घरी परत आल्यावर तिला दार बंद दिसले. तिने दार उघडून बघितले तेव्हा ही घटना उघडकीस आली. तिने बाहेर येऊन आरडाओरडा केला असता शेतात काम करणारे लोक जमा झाले.

 

पोलिसांना माहिती मिळताच गंभीर जखमी महिलेस उपचाराकरिता शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे भरती केले. मात्र जखमी मंदा राहुल डोंगरे (वय 40) हिचा उपचरादम्यान मृत्यू झाला.

 

पोलिसांनी तत्परतेने गुन्ह्यातील आरोपी राहुल डोंगरे (वय 41) याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. आरोपी विरोधात कलम 109 (1) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

 

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनील नाईक, सहपोलिस निरीक्षक प्रवीण मानकर, उपनिरीक्षक गजानन शेजुळकर, खुशाल राठोड, निरज पातूरकर, सचिन पातकमवार, निलेश शिरसाट, रुपेश नेव्हारे, गजानन गोडंबे, सुदर्शन गणवीर, विक्रांत लांडगे यांनी पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -