Saturday, August 23, 2025
Homeयोजनानोकरीरेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, पॅरामेडिकल पदांसाठी होणार भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, पॅरामेडिकल पदांसाठी होणार भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वे भरती बोर्डाने पॅरामेडिकल स्टाफ पदांसाठी भरती जाहीर केली आहे.रेल्वेने या भरतीसाठी अधिसूचनादेखील जाहीर कली आहे. तुम्हाला आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर या नोकरीबाबत सविस्तर माहिती मिळाले.

 

आरबीआरबच्या पॅरामेडिकल भरतीमध्ये नर्सिंग, सुपरिंटेंडेंट, डायलिसिस टेक्निशियन, फार्मासिस्ट या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 

रेल्वेतील पॅरामेडिकल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तसेच १० सप्टेंबरपर्यंत तुम्ही फी भरु शकतात.

 

पदांची माहिती

 

नर्सिंग सुपरिंटेडेंट-२७२ पदे

 

डायलिसिस टेक्निशियन-४ पदे

 

हेल्थ आणि मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड २-३३ पदे

 

फार्मासिस्ट-१०५ पदे

 

रेडियोग्राफर एक्स-रे टेक्निशियन-४ पदे

 

ईसीजी टेक्निशियन- ४ पदे

 

लॅबोरेटरीज असिस्टंट टेक्निशियन- १२ पदे

 

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान,राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यागदेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना ५०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्ग, महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क निश्चिक करण्यात आले आहे.

 

निवड प्रक्रिया

 

या नोकरीसाठी उमेदवारांटी निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.यामध्ये प्रोफेशनल अॅबिलिटी, सामान्य ज्ञान, रिजनिंग, विज्ञान हे विषय असणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर तुमची निवड केली जाणार आहे. प्रत्येक विषयासाठी १०० गुण असणार आहेत. त्यानंतर चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्क्सदेखील असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -