गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत मानाच्या गणपतीची मिरवणूक विविध शहरात लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्सवाचा आज पहिला दिवस आहे. उत्सवमूर्ती आता थाटात त्यांच्या स्थापना ठिकाणी पोहचत आहेत. त्याठिकाणी विधीवत प्राण प्रतिष्ठापन्ना करण्यात येईल. राज्यात आज घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. ढोल-ताशांच्या नादात आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी सुरू आहे. मानाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याची विवध शहरांमध्ये धूम सुरू आहे. भाविक भक्ती भावात न्हाऊन निघाले आहेत.
आज पासून राज्यभरात पुढील १० दिवस गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.मुंबई मधील सगळ्या मोठ्या गणपती मंडळामध्ये उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे.लालबाग-परळ परिसर तर गर्दीने फुलून गेला आहे आणि लालबाग च्या राजाच दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.लालबागच्या राजाच्या मुख दर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग लागली आहे. राज्यातही अनेक शहरात, गाव खेड्यात गणेशोत्सवाचा आनंद सोहळा सुरू आहे. दीड दिवसांचा, पाच दिवसांचा, दहा दिवसांच्या घरगुती गणपत्तीचे आगमन आज होत आहे.
देशातल्या सर्वात श्रीमंत गणेश बाप्पा म्हणजे जीएसटी सेवा मंडळ च्या 71 वा वर्ष आहे. प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी देखील इथे भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. सर्वात महत्त्वाचं या बाप्पाच्या वैशिष्ट्य आहे की इथं भाविकांची सुरक्षा आणि त्यांना योग्य पद्धतीने दर्शन व्हावं याची पुरेपूर काळजी घेतली जाते. मंडळातर्फे यंदा एकूण 474 कोटींचा विमा काढण्यात आला आहे. बाप्पाच्या मूर्तीवर जवळपास 69 किलो सोना आणि 365 किलो चांदीने शृंगार करण्यात आला आहे. नवसाला पावणारा विश्वाचा राजा म्हणून या गणपति बाप्पाची ओळख आहे.
गणेशोत्सवाची भव्यता
गणेशोत्सव म्हटले तर समोर येत ते म्हणजे मुंबईतील लालबाग परिसर, मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले गणेश गल्ली येथील मंडळाचे यंदा 98 वं वर्ष आहे. गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा सजावटीसाठी रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक थीममुळे आधीच प्रतिष्ठित असलेल्या या उत्सवाला अधिक भव्यता लाभली आहे, असे मत मुंबईचा राजा मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील परब आणि उपाध्यक्ष सिद्धेश कोरगावकर यांनी व्यक्त केले.
हक्काच्या घरासाठी बाप्पाला साकडं
मुंबईतील गिरगावकरांचं बाप्पाला साकडं घालणारे बॅनर लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर ” हे गणराया यंदा मुंबई महानगरपालिकेत मुंबईकरांच्या मनातील व मराठी माणसाच्या हक्काचे ठाकरे बंधूंचे सरकार येऊ दे ” असा आशय लिहिला आहे. गिरगाव, दादर,चर्नीरोड परिसरात गणपती निमित्त ठाकरे बंधूंचे मनपात सरकार यावं या आशयाचं बॅनर लागलं आहे.
गणरायाच्या आगमनासाठी पुण्यातील मंडळ सज्ज
पुण्यातील गणपतींची प्राणप्रतिष्ठा वाजत गाजत होणार आहे. गणरायाच्या आगमनासाठी पुण्यातील मंडळ सज्ज झाली आहेत. त्यात मानाचा पहिला ग्रामदैवत श्री कसबा गणपती, प्राणप्रतिष्ठापना थोड्याच वेळात होईल. श्रींच्या आगमन मिरवणुकीत अबालवृद्ध थिरकले आहेत. ढोलताशांचा गजर होत आहे. भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सगळं वातावरण भक्तीमय झालं आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात उत्साहाचे वातावरण
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाच्या गणेशोत्सवाची आज पासून सुरुवात होते आहे. गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या पुण्यनगरी मध्ये सकाळपासून नागरिकांना मध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शतकोत्तर परंपरा असलेले अनेक गणेश मंडळे पुण्यात आहेत. पुण्यातील मुख्य आकर्षण आणि श्रद्धचे अधिष्ठान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप पाहण्यासाठी सकाळपासून नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आगमन मिरवणुकीसाठीचा हा रथ आहे. या रथाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. सोबतच रथावरती विष्णूंची मूर्ती देखील विराजमान करण्यात आली आहे. सोबतच या सगळ्या विष्णूच्या मूर्तीला फुलांनी सजवण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी पोलिसांचे कडक, अत्याधुनिक सुरक्षा कवच
पुणेकरांच्या हृदयातील सर्वांत मोठा सोहळा श्री गणेशोत्सव यंदाही दिमाखात साजरा होणार आहे. शहरात ३९५९ सार्वजनिक गणेश मंडळे आणि तब्बल ७४ हजार ५९४ खासगी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. हा उत्सव पाहण्यासाठी पुणे शहर, ग्रामीण भाग, तसेच इतर जिल्ह्यांतून लाखो भाविकांचा लोंढा येणार असून, पुणे पोलीस दलाने व्यापक सुरक्षेचे नियोजन केले आहे. यात १३० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, एआय पॉवर्ड व्हिडिओ नालिटिक्स, ड्रोनद्वारे एरियल सव्र्व्हिलन्स, जीपीएस ट्रॅकिंग, अँटी ड्रोन गन्स, ५० मेटल डिटेक्टर आणि १५० हँड हेल्ड डिटेक्टर्स अशी अत्याधुनिक यंत्रणा तैनात केली जाणार आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागात मद्य विक्रीस बंदी
शहराच्या मध्यवर्ती भागातील खडक विश्रामबाग आणि फारसखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बुधवारपासून सात सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात अकरा दिवस संपूर्ण मध्ये विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी मध्ये विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जळगावमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दल सज्ज झाल असून जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलाचे 3 हजार 400 कर्मचारी अधिकारी, 1 हजार 800 होमगार्ड व एसआरपी एफ ची तुकडी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात 3 हजारावर सार्वजनिक गणेश मंडळाकडून तर 160 गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात येत आहे. १० जणांवर तडीपारीची तर एकावर एमपीडीएची कारवाई, तसेच 255 उपद्रवींवर कारवाई करण्यात येऊन त्यांना जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आले आहे.
सोशल मीडियावर देखील जिल्हा पोलीस दलाची करडी नजर राहणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर पोलीस फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करणार आहेत. तसेच एखाद्या आक्षेपार्य पोस्ट एखाद्या व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल होऊन त्यावर चॅटिंग झाल्यास व्हाट्सअप एडमिन वर सुद्धा कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सन आनंदात पण शांततेत सादर करावे, कायद्याचं पालन करावं असा आवाहन पोलीस अधीक्षकांनी केला आहे.
तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मराठी कलाकारांच्या घरी वाजत गाजत गणपत्ती बाप्पा आले आहेत. अनेक सेलिब्रिटींचा उत्साह गगनात मावत नाहीये. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर,सोलापूर,नाशिक,जळगाव,छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गडचिरोलीत गणेशभक्तांचा वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. हा उत्सव व्हायब्रंट झाला आहे.