Monday, November 24, 2025
Homeब्रेकिंगभारताला तेल आणि गॅस निर्यात करणे तात्काळ थांबवा, डोनाल्ड ट्रम्प यांचे युरोपियन...

भारताला तेल आणि गॅस निर्यात करणे तात्काळ थांबवा, डोनाल्ड ट्रम्प यांचे युरोपियन देशांना थेट आदेश, संकट..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, म्हणून दबाव टाकताना दिसले. भारताने अमेरिकेचे ऐकले नाही मग त्यांनी थेट भारतावर 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर भारत झुकत नसल्याने त्यांनी आग ओकण्यास सुरूवात केली. अमेरिकेकडून मिळणाऱ्या धमक्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरील संवाद देखील बंद केले.

 

भारत पाकिस्तान युद्धाबाबतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धक्कादायक विधाने करताना दिसले आहेत. भारत आपल्या अटी मान्य करत नसल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे थेट आता मोठे पाऊल उचलत आहेत. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, व्हाईट हाऊसने युरोपीयन देशांना सांगितले आहे की, अमेरिकेने ज्याप्रमाणे भारतावर प्रतिबंध लावले आहेत, तसे तुम्ही देखील लावा. युरोपातून भारताला पाठवण्यात येणारी तेल आणि गॅस लगेग बंद करा, अशी आदेश देण्यात आलीत.

 

आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आदेशानंतर युरोपीयन देशी भारताबद्दल नक्कीच काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मुळात म्हणजे 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यकडून भारताला धमकावत सांगण्यात आले होते की, तुमच्याविरोधात अजून कडक पाऊले उचलली जाऊ शकतात जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले नाही तर .आता भारताला टॅरिफसोबतच नवीन संकट झेलावे लागेल असे सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे.

 

अमेरिकेचे म्हणणे आहे की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेन विरोधातील युद्धात रशियाला पैसा मिळत आहे. युरोपीयन देशांनी भारताला तेल आणि गॅस निर्यात करणे बंद केले तर याचे गंभीर परिणाम हे भारतावर होऊ शकतात. शिवाय आमच्याप्रमाणेच भारतावर प्रतिबंध लावा म्हणजे टॅरिफ लावा, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत, चीन आणि रशिया हे तिन्ही देश एकत्र आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसला आहे. आता ते भारताला चीन आणि रशियासोबत न जाण्यासाठी दबाव टाकताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -