जीएसटी काऊन्सिलच्या काल (बुधवार 3 सप्टेंबर) झालेल्या 56 व्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत 5% आणि 18% या दोन टॅक्स स्लॅबना मंजूरी देण्यात आली असून देशात आता फक्त हे दोनच स्लॅब्स असतील.या बैठकीत सर्सामान्य जनतेला दिलासा मिलेल असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दर कमी केला आहे तसेच 33 जीवनरक्षक औषधांवरील 12% जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे आणि तो शून्य करण्यात आला आहे. कॅन्सरच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांवरील जीएसटी देखील शून्य केला आहे.
आजच्या काळात अनेक गंभीर आणि दुर्मिळ आजारांवर उपचार करणे खूप महाग आहे. या औषधांवरील जीएसटी रद्द केल्याने रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक फायदा होईल. महागडी औषधे घेण्यास अडचणी येत असलेल्या कुटुंबांना या निर्णयामुळे फायदा होील. अशा औषधांवरील जीएसटी 12% वरून शून्य करण्यात आला आहे, ज्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळ शकेल. या औषधांवर जीएसटी नसल्याने आता उपचारांचा खर्च कमी होईल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना स्वस्त दरात उपचार मिळू शकतील.
कधीपासून होणार लागू ?
हा नवा नियम येत्या 22 सप्टेंबरपासू लागू होणार आहे. त्यानंतर देशभरात या औषधांच्या खरेदीवर कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही. त्यामुळे ही औषध विकतं घेणं थोड स्वस्त होईल.
कोणकोणत्या औषधांवर जीएसटी नाही ?
या 33 औषधांमध्ये कर्करोग, रक्त विकार, दुर्मिळ अनुवांशिक आजार आणि इतर गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या औषधांचा समावेश आहे.
Onasemnogene abeparvovec
Asciminib
Mepolizumab
Pegylated Liposomal Irinotecan
Daratumumab
Daratumumab (subcutaneous)
Teclistamab
Amivantamab
Alectinib
Risdiplam
Obinutuzumab
Polatuzumab vedotin
Entrectinib
Atezolizumab
Spesolimab
Velaglucerase Alpha
Agalsidase Alfa
Rurioctocog Alpha Pegol
Idursulphatase
Alglucosidase Alfa
Laronidase
Olipudase Alfa
Tepotinib
Avelumab
Emicizumab
Belumosudil
Miglustat
Velmanase Alfa
Alirocumab
Evolocumab
Cystamine Bitartrate
C1-Inhibitor (injection)
Inclisiran
अशी या औषधांची नावे आहेत.
आता फक्त 2 टॅक्स स्लॅब
जीएसटी कौन्सिलच्या 56 व्या बैठकीत 5% आणि 18% असे दोन कर स्लॅब मंजूर करण्यात आले. साबण, सायकल, टीव्ही आणि वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसी यासारख्या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. तर गुटखा, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेट वगळता सर्व उत्पादनांवरील नवीन दर 22 सप्टेंबर, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होतील. जीएसटी दरांमधील बदलाचा आर्थिक परिणाम सुमारे 48 हजार कोटी रुपयांचा असेल परंतु आर्थिक दृष्टिकोनातून त्याचा कोणताही महत्त्वाचा परिणाम होणार नाही असे महसूल सचिव अरविंद श्रीवास्तव म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात कर रचना सोपी करण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार, जीएसटी कौन्सिलने कर दरांमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे.