गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सासुरे गावात मंगळवारी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनं बीड आणि सोलापूर जिल्हा हादरला असून गोविंद बर्गे या तरुणाने चक्क कला केंद्रातील नर्तिकेच्या वेडापायी आपलं जीवन संपवल्याचं उघडकीस आलं आहे. गोविंद बर्गे हे कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेडे झाले होते. पूजा गायकवाड (Pooja gaikwad) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती. तसेच, त्यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीवरुन खटकेही उडाले होते. त्याच तणावातून गोविंद याने आपला जीव संपवला. त्यामुळे, दोन दिवसांपासून नर्तिक पूजा गायकवाड सोशल मीडियावरही चर्चेत आहे.
पूजा गायकवाड हिचे इन्स्टाग्राम अकाऊंट असून ती आपले नाचण्याचे व्हिडिओ आणि रिल्सही या अकाऊंटवरुन शेअर करायची. मात्र, दोन दिवसांपूर्वी केवळ 500 ते 700 फॉलोअर्स असलेल्या पूजाचे दोन दिवसांत हजारांवर फॉलोअर्स गेले आहेत. पूजाच्या इंस्टा फॉलोअर्समध्ये अचानक वाढ होत असून दोन दिवसांत हा आकडा 18 हजारांवर पोहोचला आहे. पूजा गायकवाडच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये अचानक वाढ होत असून आज 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9,454 असणारे तिचे फॉलोअर्स संध्याकाळपर्यंत 18000 वर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. इंस्टाग्रामवर पुजाचे नृत्यू करतानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. तर, गोविंद बर्गेच्या मृत्युपूर्वीच तिने इंस्टाला ठेवलेली स्टोरी देखील चर्चेत आहे. त्यामध्ये, माझ्याकडे तुझ्यासारखे चार आहेत, अशा आशयाचा मेसेज दिसून येतो. पुजाने आपल्या इंस्टा अकाऊंटवरुन आत्तापर्यंत 30 पोस्ट केल्या असून व्हिडिओमध्ये ती डान्स करताना, 500 रुपयांच्या नोटासह रिल्स बनवताना दिसून येते.
पुजाकडून
अलिशान
घराची मागणी
गोविंद बर्गे हे सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते. मात्र, त्याठिकाणी अपेक्षित गोष्टी न घडल्याने गोविंद बर्गे यांनी याच नर्तिकेच्या घरासमोर कारमध्ये स्वत:च्या कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली. पूजा गायकवाड ही पारगावच्या कला केंद्रात नर्तिका असून ती 21 वर्षांची आहे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली होती. कालांतराने पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे यांनी प्रेमप्रकरण सुरु असताना पूजा गायकवाड हिला पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने दिले होते. गेल्या काही दिवसांपासून पूजा गायकवाड ही गोविंद बर्गे यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद बर्गे नैराश्यात होते. पूजाने गोविंद बर्गे यांच्याकडे गेवराईतील बंगला आपल्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन करा, अशी मागणी केल्याचा आरोप आता पूजाच्या नातेवाईकांकडून होत आहे. गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने पूजा गायकवाड हिच्याविरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल करत तिला अटकही केली आहे.