Wednesday, September 17, 2025
Homeमहाराष्ट्रप्राध्यापक पतीनं पत्नीचे कपडे फाडले, रस्त्यावरुन काढली धिंड; प्रियकराला अर्धनग्नावस्थेत भांगेत भरायला...

प्राध्यापक पतीनं पत्नीचे कपडे फाडले, रस्त्यावरुन काढली धिंड; प्रियकराला अर्धनग्नावस्थेत भांगेत भरायला लावलं कुंकू

ओडिशातील पुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन व्याख्याता (Puri lecturer) असलेल्या एका व्यक्तीनं अनैतिक संबंधांच्या संशयावरून आपल्या पत्नीवर आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणावर निर्दय हल्ला केला.

 

हल्ल्यानंतर दोघांचे कपडे फाडून त्यांना अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरून फिरवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी आरोपी व्याख्यात्यासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

 

हातोड्याने दोघांवर हल्ला

 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जगतसिंगपूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात वाणिज्य विषयाचा प्राध्यापक असलेला आरोपी मंगळवारी अचानक पुरी येथील आपल्या पत्नीच्या घरी पोहोचला. त्या घरात पत्नी आणि आणखी एक तरुण आढळल्याने त्याने हातोड्याने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

 

पत्नी पतीपासून राहत होती वेगळी

 

पोलिसांच्या माहितीनुसार, ३७ वर्षीय पीडित महिला घरगुती हिंसाचारामुळे आपल्या ४३ वर्षीय पतीपासून वेगळी राहत होती. ती पुरी जिल्ह्यातील भाड्याच्या घरात आपल्या १४ वर्षीय मुलासोबत वास्तव्यास होती.

 

‘त्या’ दोघांची शहरातून काढली धिंड

 

हल्ल्यानंतर आरोपी प्राध्यापकानं पत्नी आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाचे कपडे फाडले. महिलेचे केस धरून तिला रस्त्यावरुन ओढत नेले. दोघांना एकमेकांना हार घालण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर, त्या तरुणाला जबरदस्तीने महिलेच्या कपाळावर कुंकू लावायला भाग पाडले. या अपमानास्पद कृत्यानंतर त्यांची शहरातून धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपी प्राध्यापक आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -