टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेतील आपला तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी 19 फेब्रुवारीला होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात ओमान विरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात ओमानवर मात करुन विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
कुलदीप यादवला मिळाला सामनावीराचा पुरस्कार
कुलदीप यादवला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने 4 षटकात 18 धावा देत 3 गडी बाद केले. दोन विकेट सलग घेतल्याने पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर गेला. ‘मी माझ्या योजना आखल्या होत्या आणि त्या अंमलात आणल्या. पहिला चेंडू नेहमीच विकेट घेणारा असतो, फक्त त्या मानसिकतेसह जावे लागेल आणि विकेट घेणारा चेंडू राबवावा लागेल. फलंदाज कदाचित सेट असेल पण तो पहिल्यांदाच माझ्यासमोर येत आहे. तरीही मला माझ्या गोलंदाजीवर खरोखर काम करण्याची गरज आहे असे वाटते. कधीकधी मला वाटते की मी खूप जास्त व्हेरिएशन वापरतो.‘, असं कुलदीप यादव म्हणाला..
भारताने पाकिस्तानला लोळवलं, चार षटकं राखून मिळवला विजय
आशिया कप 2025 स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 128 धावांचं आव्ाहन ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 3 गडी गमवून 16 व्या षटकात पूर्ण केलं. या विजयासह भारताने सुपर 4 फेरीत एन्ट्री मारली आहे.टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
टीम इंडियाने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी आणखी 28 धावांची गरज आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे ही जोडी मैदानात खेळत आहे. ही जोडी किती ओव्हरमध्ये सामना संपवते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.