अल्पवयीन मुलीशी अश्लीलचाळे करून त्याचे फोटो काढणाऱ्या एका युवकाच्या विरोधात मुरगूड पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीस मुरगूड पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे
श्रेयस ज्ञानेश्वर डवरी वय २७ रा. सेनापती कापशी (ता.कागल) असे त्याचे नाव आहे.
याबाबत मुरगूड पोलीसातून मिळालेली अधिक माहिती अशी की संशयित श्रेयस ज्ञानेश्वर डवरी हा पिडीत मुलीच्या घरी कोणी नसल्याचे हेरून तिच्या घरी जावून तिच्याशी वारंवार अश्लील चाळे करीत होता. याचे फोटो पिडीत मुलीच्या आईच्या मोबाईल मध्ये काढत होता. हे बाहेर कोणाला सांगितले तर तिला व तिच्या आईला ठार मारण्याची धमकी देत होता.तसेच त्या मोबाईलवर वारंवार संपर्क करून पिडीत मुलीस त्रास देत होता. याबाबतची फिर्याद पिडीत मुलीने मुरगूड पोलिसात दिली असून त्यानुसार त्या युवकावर भा.न्या. सं. कलम 75,79,333,352 (2), (3) सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8,10,12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे करीत आहेत.