Thursday, November 13, 2025
Homeमहाराष्ट्रसाखरपुड्याच्या 7 दिवस आधी तीन चुलत बहिणी शेतावर गेल्या, तिथे जे घडलं...

साखरपुड्याच्या 7 दिवस आधी तीन चुलत बहिणी शेतावर गेल्या, तिथे जे घडलं त्याने अख्ख्या गावात उडाली खळबळ

कर्नाटकच्या रायचूरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलय. एका मुलीच लग्न ठरलेलं. सात दिवसांनी तिचा साखरपुडा होता. मात्र, त्याआधी तीन चुलत बहिणी शेतावर गेल्या. तिथे जे घडलं, त्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

 

तीन मुली शेतात गेल्या. आधी एकीने विष प्राशन केलं. बेशुद्ध होऊन ती पडली. तिला पाहून अन्य दोन मुलींनी सुद्धा तेच केलं. म्हणजे त्या सुद्धा विष प्याल्या. दोघींनी विष प्राशनानंतर विहिरीत उडी मारली. या घटनेत एका युवतीचा मृत्यू झाला. अन्य दोन युवतींचा आयुषासाठी रुग्णालयात संघर्ष सुरु आहे. हे प्रकरण इराबगेरा ग्राम पंचायत क्षेत्रातील क्वारियारोड्डी गावचं आहे.

 

मृतकाच नाव रेणुकम्मा मज्जिगे (18) आहे. सुनीता मज्जिगे आणि मुदुकम्मा मज्जिगे यांना तालुक्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांची हालत गंभीर आहे. त्यामुळे त्यांना रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलय. तिन्ही मुली चुलत बहिणी आहेत. तिघांनी इतकं टोकाच पाऊल का उचललं? त्याची माहिती समोर आलेली नाही. देवदुर्गा पोलिसांच्या चौकशीत हा विषय प्रेम प्रकरणाशी संबंधित असल्याच समोर आलय.

 

एकीचा मृत्यू

 

रविवार रेणुका, सुनीता आणि मुदुकम्मा कामासाठी शेतात गेल्या होत्या. त्यावेळी सुनीताने विष प्राशन केलं. सुनीता बेशुद्ध होऊन पडल्यानंतर रेणुका आणि मुदुकम्माने कीटनाशकाच सेवन केलं. त्यांना वाटलं की, सुनीताचा मृत्यू झालाय. म्हणून त्यांनी जवळच्या विहिरीत उडी मारली. स्थानीय लोकांनी मुदुकम्माला वाचवलं. पण रेणुकाचा या घटनेत मृत्यू झालाय.

 

रेणुकाच्या कुटुंबाने देवदुर्गा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. त्यांनी सुनीता आणि मुदुकम्मावर संशय व्यक्त केला. सध्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -