6,6,6,6,6, मुलाच्या बॉलिंगवर सलग 5 सिक्स, वडिलांचं हार्ट आशिया कप 2025 दरम्यान एक वाईट बातमी आली आहे. एका युवा खेळाडूने आपल्या वडिलांना गमावलं. हा खेळाडू 18 सप्टेंबरला अबूधाबीमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान दरम्यान झालेल्या सामन्यात खेळला होता. पण मॅच दरम्यान त्याच्या वडिलांच निधन झालं. सामना संपल्यानंतर खेळाडूंना ही माहिती देताच टीममध्ये दु:खाच वातावरण पसरलं. हा खेळाडू आता उर्वरित सामन्यात सहभागी होणार की नाही? यावर सस्पेंस निर्माण झाला आहे.
श्रीलंकेचा उदयोन्मुख क्रिकेटपटू दुनिथ वेलालागेला मोठा धक्का बसला आहे. दुनिथ वेलालागेचे वडिल सुरंगा वेलालागे यांचं निधन झालय. दुनिथ आशिया कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात खेळत असतानाच ही दु:खद घटना घडली. या सामन्यात श्रीलंकेने शानदार विजय मिळवला. त्यांनी सुपर फोरमध्ये प्रवेश केलाय. दुनिथ वेलालागे या मॅचमध्ये खेळत होता. पण सामना संपल्यानंतरच त्याला वडिलांच्या निधनाची माहिती देण्यात आली. ही बातमी कळताच दुनिथ वेलालागे शोकसागरात बुडाला.
वेलालागेची अनुपस्थिति टीमसाठी आव्हानात्मक ठरु शकते
या घटनेनंतर दुनिथ वेलालागे लगेच मायदेशी रवाना झालाय. आता तो आशिया कपच्या उर्वरित सामन्यात तो खेळणार की नाही? या बद्दल शंका आहे. श्रीलंकेला आता सुपर फोरमध्ये बांग्लादेश, पाकिस्तान आणि भारतासारख्या मजबूत संघांविरुद्ध खेळायचं आहे. दुनिथ वेलालागेची अनुपस्थिति टीमसाठी आव्हानात्मक ठरु शकते.
दुनिथच्या ओव्हरमध्ये 5 सिक्स
दुनिथ वेलालागेच्या वडिलांच्या मृत्यूच कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीय. काही मिडिया रिपोर्ट्सनी या घटनेला सामन्याशी जोडलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात शेवटची ओव्हर दुनिथ वेलालागेनेच टाकली होती. हे षटक खूप महागड ठरलं. दुनिथ वेलालागेच्या या ओव्हरमध्ये मोहम्मद नबीने पाच सिक्स मारले. एकूण 32 धावा या ओव्हरमध्ये वसूल केल्या. मिडिया रिपोर्ट्सनुसार, या ओव्हरनंतरच दुनिथ वेलालागेच्या वडिलांना ह्दयविकाराचा झटका आला. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून या घटनेवर अजून काही अपडेट आलेली नाही.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये श्रीलंकेचे कोच सनथ जयसूर्या आणि टीम मॅनेजर सामन्यानंतर दुनिथ वेलालागेला वडिलांच्या मृत्यूची माहिती देताना दिसतायत. सामना संपल्यानंतर अफगाणिस्तानचा दिग्गज ऑलराऊंडर मोहम्मद नबीला या घटनेबद्दल सांगितलं, त्यावेळी तो सुद्धा हैराण झाला.