Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रमला अजून ट्रोल करा.. गौतमी पाटीलने सोडलं मौन ! अपघाताबद्दल म्हणाली…

मला अजून ट्रोल करा.. गौतमी पाटीलने सोडलं मौन ! अपघाताबद्दल म्हणाली…

प्रसिद्ध नर्तकी गौतमी पाटील ही सध्या कार अपघातामुळे चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात तिच्या मालकीच्या कारने एका रिक्षाला धडक दिली, ज्यामध्ये रिक्षाचलक सामाजी मरगळे हे गंभीर जखमी झाले. मात्र कारचालक त्यांना मदत न करताच तिथून पळून गेला आणि नंतर ती कारही तेथून हटवण्यात आली. स्थानिकांच्या मदतीने रिक्षाचलाकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या सर्व प्रकरणावरून गौतमी पाटीलवर मोठी टीका होत आहे. कारण ज्या गाडीमुळे अपघात झाला ती कार गौतमीच्या मालकीची होती. अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या मदतीसाठी ती पुढे आली नाही, अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून तिने उपचारांचा खर्चही देण्याची तयारी दखावली नाहीव असे आरोप होत असून काल पुण्यात तिच्याविरोधात आंदोलनही करण्यात आलं.

 

अखेर या अपघाताच्या आठवड्याभरानंतर या संपूर्ण प्रकरणावर गौतमी पाटील हिने मौन सोडलं असून तिची बाजू मांडली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे गौतमीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम झाल्यायनंतर गौतमीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “मी दोषी नाही. अपघात झाला तेव्हा मी कारमध्ये नव्हते, सीसीटीव्हीतही ते दिसलं ” असं गौतमीने स्पष्ट केलं.

 

” मी त्यात दोषी नाही.हे पोलिसांनीदेखील सांगितलं आहे. ती कार माझी होती, पण मी त्यात नव्हते. हे मी आधीही सांगितलं आहे. मला बऱ्याच गोष्टींसाठी सगळे लोकं ट्रोल करत आहेत. पण कोण काय म्हणतंय याकडे आता मी लक्ष देत नाही. उलट मी म्हणेन अजून ट्रोल करा. कारण पोलिसांनी स्पष्ट सांगितलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आहेत, सगळं चेक केलं, अपघातावेळी मी त्या गाडीत नव्हते, तरीही मला दोषी ठरवलं जात आहे तर मी या गोष्टीकडे जास्त लक्ष देणार नाही” असं गौतमीने स्पष्ट केलं. ज्या गोष्टींमध्ये नाही, त्यामध्ये मला पाडू नका, असंही तिने सुनावलं.

 

चंद्रकांत पाटील यांच्या त्या विधानावरही दिली प्रतिक्रिया

 

हे अपघात प्रकरण समोर आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. त्यांच्याकडे ते प्रकरण गेल्यावर, गौतमी पाटीला कधी उचलणार? असा सवाल त्यांनी पोलिसांना केला होता. त्यावरही गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे. ” दादांना जे वाटलं ते दादा बोलले. कोणाला काय उत्तर द्यायचं, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना वाटलं त्यांनी तसं उत्तर दिलं. माझं फक्त एकच म्हणणं आहे की अपघाता झाला, त्यावेळी मी त्या गाडीत उपस्थित नव्हते. ” याचा तिने पुनरुच्चार केला.

 

काय आहे प्रकरण ?

 

गेल्या आठवड्यात, म्हणजेच 30 सप्टेंबरच्या रात्री वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला भरधाव कारने धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालकाला सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले. कारचालक मात्र मदतीसाठी न थांबता तसाच पळून गेला, नंतर ती कारही तेथून हटवण्यात आली. मात्र रिक्षाचालक मरगळे यांना बराच वेळ मदत मिळाली नाही. अखेर बऱ्याच वेळाने स्थानिकांनी त्यांना उठवत उपचारांसाठी रुग्णालयात नेले. अपघात झाला ती कार गौतमीच्या नावे असून आता याप्रकरणात अधिक तपास सुरू आहे. गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे तिला बरंच ट्रोलही करण्यात आलं. अखेर आठवड्याभरानंतर तिने याविषायवर प्रतिक्रिया दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -