Saturday, October 18, 2025
Homeयोजनानोकरीमंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार मिळणार ८५००० रुपये; अर्ज कसा करावा?

मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार मिळणार ८५००० रुपये; अर्ज कसा करावा?

तुम्ही जर सीए किंवा सीएस उत्तीर्ण धाला असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सीए आणि सीएस पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने भरती जाहीर केली आहेया कंपनीने कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयासाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये यंग प्रोफेशनल आणि असिस्टंट यंग प्रोफेशनल पदे भरली जाणार आहेत.

 

ICSI कंपनीत नोकरीची संधी

 

या कंपनीत भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवार ICSI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी मदतीपूर्वी अर्ज करावेत. www.icsi.edu या वेबसाइटवर अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

 

कॉर्पोरेट मंत्रालयाअंतर्गत एकूण १४५ पदे भरती केली जाणार आहे. यंग प्राफेशनल पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी सीए/सीएस/सीएमएस पास उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठीचे ठिकाण सेंट्रल फॅसिलिटी सेंट आयआयसीए, प्लॉट क्रमांक ६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर, गुरुग्राम जवळ, हरियाणा असणार आहे.

 

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असावी. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. तुमच्या गुणवत्तेनुसार तुमची निवड केली जाणार आहे.

 

पगार (Salary)

 

यंग प्रोफेशनल्स पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७५,००० रुपये पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी ८०,००० तर तिसऱ्या वर्षी ८५००० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट यंग प्रोफेशनल्स पदासाठी पहिल्या वर्षी ४०,००० रुपये, दुसऱ्या वर्षी ४२५०० तर तिसऱ्या वर्षी ४५००० रुपये पगार मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -