Friday, October 17, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात दारूला पैसे देत नाही म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात मुलानंच घातला वरवंटा

कोल्हापुरात दारूला पैसे देत नाही म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात मुलानंच घातला वरवंटा

कोल्हापुरात दारूसाठी पैसे देत नसल्याने जन्मदात्या आईच्या डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून केल्याची धकादायक घटना घडली. कोल्हापुरातील साळुंखे पार्क परिसरामध्ये ही घटना घडली. सावित्रीबाई अरुण निकम (वय 53) असं मृत महिलेचे नाव आहे. राजारामपुरी पोलिसांनी खून करणारा नराधम मुलगा विजय निकमला घटनास्थळावरून अटक केली आहे. आईचा खून केल्याने कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आईचा खून केल्याचे समजताच परिसरांनी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून तपासणी आणि पंचनामा केला. डोक्यात वरंवटा घातल्याने सावित्रीबाई यांच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -