Sunday, October 26, 2025
Homeमहाराष्ट्र५ वा १० वर्षात करोडपती बनण्यासाठी SIP त दर महिन्यास किती रुपये...

५ वा १० वर्षात करोडपती बनण्यासाठी SIP त दर महिन्यास किती रुपये गुंतवावे लागतील ?

जर तुम्ही ५ वा १० वर्षात करोडपती बनण्याचे स्वप्न पाहात असाल तर फार कठीण नाही. म्युच्युअल फंडाची SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानने छोटी छोटी बचत करुन मोठा फंड बनवला जाऊ शकतो. केवळ थोडे धैर्य आणि योग्य प्लानिंगची गरज असते. जर तुम्ही विचार करत असाल की दर महिन्यास किती रुपये लावून १० वा १५ वर्षांत एक कोटीहून अधिकचा फंड जमा करता येईल. तर यासाठी एक छोटाशा बचतीचे कॅलक्युलेशन समजावे लागेल.

 

पाच वर्षात करोडपती होण्यासाठी दर महिन्याला SIP मध्ये किती गुंतवावे ?

एसआयपीची सर्वात मोठी जादू कंपाऊंडिंग आहे. म्हणजे, जो पैसा तुम्ही लावता त्यावर व्याज मिळते. आणि नंतर केवळ व्याजावर व्याज मिळते. यामुळे तुमची रक्कम वाढत जाते. जर तुमच्याकडे जास्त पैसे नाहीत. तर दर महिन्याला २००० वा ५००० रुपयांनी सुरुवात करु शकता.

 

पाच वर्षांत एक कोटी जमा करणे फारसे अवघड नाही. जर १२ टक्के वार्षिक रिटर्न मानले तर तुम्हाला दर महिन्यास सुमारे १,२५,००० रुपयांची एसआयपी करावी लागली. ही रक्कम ५ वर्षांनी १२ टक्के रिटर्न सह सुमारे १,०१,३७,९५२ रुपयांपर्यंत पोहचू शकते. म्हणजे थोडा जास्त रिटर्न ( १३-१४ टक्के ) मिळाला वा काही जास्त गुंतवणूक केली, तर उदाहरणार्थ १,३०,००० रुपये महिने तर ५ वर्षात एक कोटीचे टार्गेट पूर्ण होऊ शकते. परंतू एवढी रक्कम दर महिन्यास गुंतवणूक करणे प्रत्येकाला जमत नाही. यासाठी चांगला इन्कम आणि योग्य फंड निवडणे गरजेचे आहे.

 

तुम्हाला १० वर्षात एक कोटीहून जास्त फंड हवा असेल तर…

तुम्हाला १० वर्षात एक कोटीहून जास्त फंड हवा असेल तर यासाठी तुम्हाला दर महिन्यास चांगली मोठी रक्कम रक्कम गुंतवावी लागेल.जर तुम्ही दर महिन्याला ५०,००० रुपये एसआयपीत टाकत असाल तर सरासरी १२ टक्के रिटर्न मिळेल. तर १० वर्षानंतर तुमच्या जवळ १,१२,०१,७९४ रुपयांहून जास्त जमतील. आता ही रक्कम एक कोटीहून थोडी कमी आहे.परंतू जर रिटर्न १२ टक्क्यांहून जास्त झाले तर उदा. १३ – १४ टक्के तर ५० हजार रुपये महिन्याला जमा करुनही १,१८,१५, ५५६ रुपयांचा फंड बनू शकतो.

 

१५ वर्षांत एक कोटी हवे असतील तर…

आता तुम्ही १५ वर्षांचा कालावधी घेतला तर ही बाब आणखीन सोपी होऊन जाईल. कमी पैसे लावूनही देखील जास्त मोठा फंड बनवता येईल. समजा तुम्ही दर महिन्याास २५,००० रुपये एसआयपीत टाकले. जर १२ टक्क्यांचा सरासरी रिटर्न मिळाला. तर पंधरा वर्षांत तुमच्या जवळ १,१८,९८, २८५ रुपयांचा फंड तयार होईल.

 

१२ टक्के रिटर्न यासाठी की चांगले म्युच्युअल फंड दीर्घकाळात इतके रिटर्न देतात. परंतू हे फंड निवडीवर अवलंबून आहे. चांगला फंड निवडण्यासाठी थोडे संशोधन करावे लागेल. यासाठी तुम्ही चांगल्या फायनान्शिय एडव्हायझरचा सल्ला घेऊ शकता. आणि जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक कराल तेवढा अधिक फायदा तुम्हाला मिळू शकतो. लवकर गुंतवणूक म्हणजे कंपाऊंडींगसाठी जास्त वेळ मिळेल आणि तुमचा पैसा वेगाने वाढेल.

 

जर तुम्ही आजपासून एसआयपी सुरु केली. तर १० ते १५ वर्षांनी तुम्ही न केवळ करोडपती बनास तसेच फानान्शियल फ्रीडम देखील मिळवू शकाल. परंतू लक्षात ठेवा की म्युच्युअल फंडात जोखीम असते. बाजार वर खाली जाऊ शकतो. यासाठी योग्य फंडाची निवड करा. दीर्घकाळ पेन्शन्स ठेवला आणि दर महिन्याला नियमित गुंतवणूक करत राहा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -