ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर जिल्हा बँकेत शिवसेना आणि सत्तारूढ गट अशी दुरंगी लढत सुरू आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून शिवसेना आणि सत्तारूढ गटातील पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कलगीतुरा रंगत आहे. आज शिवसेनाप्रणित ‘राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी’चा मेळावा गुरुवारी (ता.३० डिसेंबर) झाला. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टिका केली. (Kdcc Election)
खासदार संजय मंडलीक यांनी दोन्ही मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. मंडलीक यांनी दोन्ही मंत्र्यांची नाव न घेता अदानी अंबानीशी तुलना करत म्हणाले की, देशाचे राजकारण अदानी-अंबानी चालवीत आहेत. अशाच प्रकारे कोल्हापुरातही दोन नेते जिल्ह्याचे सोयीचे राजकारण करत आहेत. जिल्ह्यातील या ‘अदानी-अंबानी’ यांचे हे सोयीचे राजकारण कोल्हापूरची स्वाभिमानी जनता सहन करणार नाही.
या अदानी-अंबानीपासून जिल्हा वाचवायचा आहे. कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी परिवर्तन आघाडी स्थापन करुन जिल्हा बँकेची निवडणूक लढवित आहे. अशी खरमरीत टीका खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.
शिवसेनेने मुश्रीफांना भरभरून दिले असे मी म्हटले नव्हते. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. शिवसेनेने दोन्ही काँग्रेसला शिक्षक व पदवीधर मतदारसंघात भरभरुन मते दिली. गोकुळची निवडणूक आणि जिल्हा परिषदसाठी मदत केली. मात्र काही मंडळी कार्यकर्त्यांची अडवणूक करत सोयीचे राजकारण करत आहेत.
कोल्हापूर जिल्हातील दोन्ही नेते ‘अदानी-अंबानीं’ संजय मंडलिकांचे टीकास्त्र
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -