Saturday, October 25, 2025
Homeमहाराष्ट्रब्रेकिंग : महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना आता 'हे' तृणधान्ये मोफत दिले जाणार...

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना आता ‘हे’ तृणधान्ये मोफत दिले जाणार !

महाराष्ट्रातील रेशन धारकांसाठी आत्ताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. आता राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना एक नवीन तृणधान्य मोफत देण्यात येणार आहे.

 

रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ सोबतच आता ज्वारी सुद्धा मोफत मिळणार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार गव्हाचे प्रमाण कमी करून आता रेशन कार्ड धारकांना ज्वारी हे तृणधान्य सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. नक्कीच या निर्णयामुळे राज्यातील रेशन कार्डधारकांना दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे वाटप करण्यात येणार आहे.

 

गेल्यावर्षी ज्वारीचे विक्रमी उत्पादन झाले होते आणि राज्य शासनाने देखील मोठ्या प्रमाणात हमीभावात ज्वारीची खरेदी केली. दरम्यान आता याच ज्वारीचे राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात येणार आहे.

 

नोव्हेंबर महिन्यापासून रेशन कार्ड धारकांना गहू तांदूळ सोबत ज्वारीचे वाटप करण्यात येणार असून जवळपास पुढील दोन महिने रेशन कार्डधारकांना ज्वारी दिली जाईल अशी माहिती पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून यावेळी समोर आली आहे.

 

केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी अंतर्गत राज्यात भरड धान्य खरेदीच्या सूचना मिळाल्या होत्या. यानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात एमएसपीवर ज्वारीची खरेदी केली आणि आता याच ज्वारीचे रेशन कार्ड धारकांना वाटप करण्यात येईल.

 

प्रत्येक पात्र कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी एक किलो ज्वारी देण्यात येणार आहे. ज्वारीचे वाटप फक्त दोन महिन्यांच्या कालावधीसाठी होणार आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या रेशन कार्ड धारकांना ज्वारीचे वाटप करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

 

अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हानिहाय ज्वारीचे वाटप आणि उचल प्रक्रिया सुद्धा निश्चित केली असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे.

 

तसेच सरकारने पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच नोव्हेंबर पासून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण ज्वारीचे वितरण पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाल्या आहेत.

 

कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार ज्वारी?

 

पुणे शहर

 

पुणे जिल्हा

 

सातारा

 

सांगली

 

नांदेड

 

परभणी

 

धाराशिव

 

बीड

 

अहिल्यानगर

 

लातूर

 

सोलापूर शहर

 

सोलापूर जिल्हा

 

हिंगोली

 

वर्धा

 

नागपूर

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -