Saturday, October 25, 2025
Homeमहाराष्ट्रकॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीत नाचायला गेला आणि जीव गमावला, त्याच्यासोहबत काय घडलं ?

कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीत नाचायला गेला आणि जीव गमावला, त्याच्यासोहबत काय घडलं ?

दहावी , 12 वीनंतर नव्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी खूप उत्सुक असतात. नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी बहुतांश कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टीदेखील ठेवली जाते. लातूर जिल्ह्यातील एका खासगी कॉलेजमध्येही अशीच एक फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र तीच पार्टी एका विद्यार्थ्यासाठी अखेरची आणि जीवघेणी ठरली. खासगी कॉलेजमधील या पार्टीमध्ये कथितरित्या हल्ला झाल्यालवर एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर रोजी लातूरच्या MIDC एरिआमधील एका प्रमुख कॉलेजमधील फ्रेशर्स पार्टीदरम्यान हा प्रकार घडला. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, या पार्टीत डान्स करताना शुल्लक कारणावरून वाद झाला , मात्र पाहता पाहता तो वाद वाढत गेला आणि त्याचे हिंसाचारात रुपांतर झाले. त्या पार्टीत पीडित सूरज शिंदे याचा काही विद्यार्थ्यांच्या ग्रुपशी वाद झाला. भांडणानंतर रगत असलेल्या त्या ग्रुमधील मुलांनी शिंदे याला लाथा-बुक्क्यांनी मारलं तसंच त्याच्यावर दांडक्यानेही वार केले. या मारहाणीत सूरज शिंदे हा गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र दुर्दैवाने तेथे त्याचा मृत्यू झाला.

 

या घटनेनंतर, पोलिसांनी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आणि 16 ऑक्टोबरपर्यंत चार विद्यार्थ्यांना अटक केली. तर मंगळवारी (21 ऑक्टोबर) आणखी दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या मुलांचाही हल्ल्यात सहभागी असल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी त्यांनाही अटक केली. आता अटकेतील मुलांची संख्या 6 झाली आहे.

 

या सर्व सहा जणांवर भारतीय दंड संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये खून, स्वेच्छेने दुखापत करणे, धोकादायक शस्त्रे किंवा साधनांचा वापर करून गंभीर दुखापत करणे, गुन्हेगारी धमकी देणे आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे या कलमांचा समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार या हत्या प्रकरणाचा तपासाचे नेतृत्व करत आहेत.

 

कुटुंबियांना हत्येची शंका

 

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत, मुंबईतील सत्या कॉलेजमधील 21 वर्षीय विद्यार्थिनीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. पोलिसांनी तपास केला असता, घटनेच्या वेळी ती एकटीच असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले.मात्र तिच्या कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. ती विद्यार्थिनी खाली पडताच कॉलेज स्टाफने तिल उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या मृत्यूमुळे शिक्षकांपासून ते सहकारी विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण स्तब्ध झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -