ऑक्टोबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही अजून महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान, लवकरच महिलांना पैसे येणार असल्याचे दिसत आहे. येत्या आठवड्याभरात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. याबाबत अजून कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाईल.
लाडकी बहीण योजनेत येत्या ८ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. पुढच्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल. त्याआधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार नाही. त्यामुळेच महिलांना काही दिवसात पैसे येऊ शकतात. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, आता या योजनेत केवायसी प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योजनेअंतर्गत केवायसीला ब्रेक लावण्यात आला आहे. पुढील काही दिवस लाडकी बहीण योजनेत केवायसी स्थगित करण्यात आली आहे. लवकरच ही प्रक्रियादेखील सुरु केली जाईल.






