Thursday, October 30, 2025
Homeराजकीय घडामोडीछगन भुजबळ तातडीने रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याने निर्णय

छगन भुजबळ तातडीने रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याने निर्णय

राज्याचे अन्न व नागरी पुरवठवामंत्री छगन भुजबळ यांना ताकडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकृती अस्थस्थ असल्याने त्यांना रुग्णा्लयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या छातीत दुखत आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार होत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना लवकरात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

भुजबळ यांची होणार अँजिओग्राफी

भुजबळ यांना छातीत दुखण्याचा त्रास होत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांच्या तत्काळ प्राथमिक चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांतून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अँजिओग्राफी केल्यानंतर भुजबळ यांच्या छातीत दुखण्याचे नेमके कारण काय हे समजू शकणार आहे.

 

मराठा आरक्षणाच्या जीआरला भुजबळ यांचा विरोध

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयाला विरोध केलेला आहे. या जीआरमुळे राज्यभरातील ओबीसींचे नुकसान होणार आहे, असा दावा त्यांनी केलाय. विशेष म्हणजे त्यांनी नुकतेच राज्यभरातील ओबीसींना एकत्र येण्याचे आवाहन करून आरक्षण वाचवण्यासाठी बीडमध्ये महाएल्गार सभेचे आयोजन केले होते. या सभेला राज्यातील हजारो ओबीसी बांधव उपस्थित होते. या सभेत छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण केले होते. तसेच आता आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

 

भुजबळ विरुद्ध जरांगे

भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. भुजबळ यांनी जीआरला थेट विरोध केल्यामुळे जरांगे भुजबळ यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात. ओबीसींच्या महाएलल्गार सभेत भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर थेट आक्षेप व्यक्त केला होता. तसेच त्यांना माझा इतिहास माहिती नाही, असे सांगत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी भविष्यात मोठा लढा उभारू, असे सूतोवाच केले होते. असे असतानाच आता भुजबळ यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या ते रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -