Monday, November 24, 2025
Homeब्रेकिंगऊस दरासाठी कुरुंदवाडमध्ये एल्गार! शहर बंद, भव्य रॅली, आंदोलनाने परिसर दणाणला

ऊस दरासाठी कुरुंदवाडमध्ये एल्गार! शहर बंद, भव्य रॅली, आंदोलनाने परिसर दणाणला

ऊस दरवाढ आणि शेतकरी नेते धनाजी चुडमुंगे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कुरुंदवाड शहरात आज (दि.२ नोव्हेंबर) पुकारण्यात आलेला बंद उत्स्फूर्तपणे यशस्वी झाला. ऊसाला प्रति टन 4 हजार रुपये दर मिळावा आणि शेतकऱ्यांवर होत असलेले हल्ले थांबावेत या मागणीसाठी व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येत या बंदला जोरदार प्रतिसाद दिला.

 

सकाळपासूनच शहरातील पालिका चौकात शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने जमले. या ठिकाणी धनाजी चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर पालिका चौकातून भव्य निषेध रॅलीला जोरदार सुरुवात झाली.

 

ठिय्या आंदोलन आणि घोषणांनी परिसर दणाणला

 

सन्मित्र चौक, नवबाग रस्ता, शिवतीर्थ, दर्गाह रस्ता, बाजारपेठ आणि भैरववाडी असा मार्गक्रमण करत ही रॅली पुन्हा पालिका चौकात परतली आणि तिचे निषेध सभेत रूपांतर झाले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे, राजू आवळे, अण्णासाहेब चौगुले, अरुण आलासे, अभिजीत पवार, सचिन मोहिते, सुनील कुरुंदवाडे, जय कडाळे, सुधाकर औरवाडे, शिवाजीराव रोडे, गोपाळ चव्हाण, सर्जेराव बाबर या प्रमुख वक्त्यांनी ऊस दराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे द्या, ऊसाला योग्य दर मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांवरील हल्ले थांबवा…यांसारख्या रणशिंग फुंकणाऱ्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

 

या नेत्यांनी शासनाला तातडीने ऊस दराचा निर्णय घेण्याचे आवाहन केले, अन्यथा पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. या ऐतिहासिक आंदोलनामध्ये बंडू उमडाळे, आप्पासाहेब भोसले, राजेंद्र बेले, आप्पासाहेब गावडे, बापूसाहेब जोंग, केरबा प्रधाने, विठोबा कोळेकर, चंद्रकांत आलासे, बाहुबली चौगुले, सर्जेराव बाबर, सुरेश कांबळे, दादासाहेब चौगुले, बाबासाहेब मालगावे यांसह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -